शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एका कोचमध्ये ११० प्रवासी; जीव गुदमरल्यामुळे एकाचा गेला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 12:16 IST

Nagpur News कोरोनामुळे कन्फर्म आणि आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा आहे. परंतु रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे एका प्रवाशाला जीव गमावण्याची वेळ आली. एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसमध्ये जीव गुदमरल्यामुळे एका प्रवाशाचा नागपूर रेल्वेस्थानकावर जीव गेला.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाचा गलथानपणा एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनामुळे कन्फर्म आणि आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा आहे. परंतु रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे एका प्रवाशाला जीव गमावण्याची वेळ आली. एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसमध्ये जीव गुदमरल्यामुळे एका प्रवाशाचा नागपूर रेल्वेस्थानकावर जीव गेला. ही घटना सकाळी ७ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली. बखोरी शिवान पासवान (७०) रा. गाव सुमेरा, पोस्ट मद्दमपूर, जि. जहानाबाद (बिहार) असे मृत झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ते रेल्वेगाडी क्रमांक ०६३५९ एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसने प्रवास करीत होते.

दीड महिन्यांपासून त्यांचे प्रकृती खराब होती. त्यांच्या सोबत मुलगा सत्येंद्र (३२) हा प्रवास करीत होता. ते एस ८ कोचमध्ये ४० क्रमांकाच्या बर्थवर होते. कोचमध्ये जवळपास ११० प्रवासी असल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर सकाळी ७ वाजता आली. बखोरी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांच्या मुलाने नागपूर रेल्वेस्थानकावरून गाडी सुटताच गाडीची चेन ओढुन गाडी थांबविली. त्याने वडिलांना खाली उतरविले. परंतु प्लॅटफार्मवर उतरविताच त्यांचा जीव गेला. त्यानंतर रेल्वेचे डॉक्टर प्लॅटफार्मवर पोहोचले. त्यांनी संबंधित प्रवाशास तपासून मृत घोषित केले. त्यानंतर लोहमार्ग पोलीस रविंद्र फुसाटे यांनी संबंधीत प्रवाशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात नेला. संबंधित प्रवाशाला कोरोना होता काय याचा अहवाल शवविच्छेदनानंतर येणार आहे. एका कोचमध्ये एवढे प्रवासी कसे ? कोरोनामुळे सध्या कन्फर्म किंवा आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा देण्यात येत आहे. परंतु एर्नाकुलम-पटना या गाडीत एस ८ कोचमध्ये ७२ प्रवाशांना प्रवासाची मुभा असताना ११० प्रवासी कोचमध्ये कसे होते हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागपूर विभागातील अधिकाऱ्यांना विचारना केली असता त्यांनी ही गाडी इतर विभागातील असल्यामुळे त्यांनी एवढे प्रवासी कसे बसविले याचे उत्तर देण्याचे टाळले.केवळ कन्फर्म, आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा ‘नागपूर विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यात केवळ कन्फर्म आणि आरएसी असलेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात येते. रितसर त्यांचे तापमान मोजुन रेल्वेस्थानकाच्या आत सोडण्यात येते.’ -एस. जी. राव. सहाय्यक वाणिज्य

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे