शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

कमाईत ‘शिवशाही’ माघारली; चाके थांबण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:17 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागांतर्गत धावणारी शिवशाही कमाईच्या बाबतीत माघारल्याचे चित्र दिसून येत आहे. बसच्या भरमसाट भाड्यामुळे प्रवाशांनी बसकडे पाठ दाखविली आहे.

ठळक मुद्देभरमसाट भाड्यामुळे प्रवाशांची पाठ

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी वाहनांच्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या अपेक्षेने एसटीमध्ये शिवशाहीचा समावेश केला होता. मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागांतर्गत धावणारी शिवशाही कमाईच्या बाबतीत माघारल्याचे चित्र दिसून येत आहे. बसच्या भरमसाट भाड्यामुळे प्रवाशांनी बसकडे पाठ दाखविली असून या गाड्यांमधील ६० टक्के सीट्स रिक्त राहत असल्याचे सांगण्यात येत असून शाही अंदाज असलेली शिवशाही बसेस उपराजधानीत बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शासनाने गाजावाजा करीत ऑक्टोबर २०१७ पासून महाराष्ट्रात शिवशाही सुरू केली होती. चमकदार वातानुकूलित खासगी बसेसना टक्कर देण्यासाठीच एसटीच्या सेवेत ही शाही बस उतरविण्यात आली होती. माहितीनुसार नागपूर विभागात एसटीच्या ३५ आणि करारावर २७ शिवशाही बसेस समाविष्ट आहेत. एसटीची शिवशाही ४३ सीटर आहे तर खासगी ऑपरेटर्सशी करार केलेल्या काही बसेस स्लिपर कोच आहेत. यामधील काही गाड्या ३० सीटर तर काही ३३ सीटर आहेत. करारावर चालणाऱ्या बसेस, चालक आणि गाड्यांचे मेंटेनन्स संबंधित ऑपरेटर्सकडे असते. दुसरीकडे बसचे वाहक आणि डिझेलच्या जबाबदारीसह प्रतिकिमी १९ रुपये एसटी महामंडळाकडून भरले जातात. शिवशाही बसेसचे भाडे खासगी आॅपरेटर्सच्या तुलनेत ३० टक्के अधिक असल्याचे सांगण्यात येते. माहितीनुसार नागपूर ते पुणेपर्यंत शिवशाही स्लीपर कोचचे भाडे १४७५ आणि पुश बॅक सीट बसचे भाडे १३७० रुपये आहे. तेच खासगी ऑपरेटर्सचे याच मार्गावरील भाडे अनुक्रमे ७०० ते ११०० रुपये आहे. कमी भाडे आणि सामानाच्या सुविधेमुळे प्रवाशी खासगी बसेसना प्राधान्य देत असतात. एसटीचे नागपूर विभागीय नियंत्रक अशोक वरठे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, पावसाळ्यात प्रवाशांची संख्या कमीच असते. पावसाळ्यानंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवशाहीची विशेषताशिवशाही बसेस वातानुकुलित असून यामध्ये एअर सस्पेंशन व व्हीटीएस सिस्टीम लावण्यात आले असून याद्वारे बसचे लोकेशन सहज लक्षात येते. अधिकारिक सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवशाहीच्या चार बसेस दुर्घटनाग्रस्त झाल्या आहेत. साध्या बसेस चालविणाºया चालकांना या बसेस चालविण्यात अडचण येते. बसेस संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी एसटीच्या घाट रोड स्थिती वर्कशॉप आणि विभागीय नियंत्रक कार्यालयात संपर्क करण्यात आला मात्र या बसेसच्या उत्पन्नाबाबत कुणीही आकडे जाहीर करण्यास तयार नाही. मंगळवारी याबाबत प्रयत्न केला असता बहुतेक अधिकाऱ्यांनी मिटींगमध्ये असल्याचे कारण देत माहिती सांगण्यास नकार दिला.

टॅग्स :Shivshahiशिवशाही