शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे नागपूरचे उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 12:14 IST

एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना मारहाण करणारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांना अखेर नागपूर ग्रामीण पोलिसांनी रविवारी नागपुरात जेरबंद केले.

ठळक मुद्देएनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना केली होती मारहाण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना मारहाण करणारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांना अखेर नागपूर ग्रामीण पोलिसांनी रविवारी नागपुरात जेरबंद केले. दरम्यान, पोलिसांनी गराडा घातल्याचे लक्षात येताच गोडबोले यांनी आपण आत्मसमर्पण करणार असल्याचा मेसेज व्हायरल करून अटकनाट्याला वळण देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला.एनटीपीसी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आणि मागण्यांच्या संबंधाने मौदा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ३० जुलैच्या दुपारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खा. कृपाल तुमाने, उपविभागीय अधिकारी (महसूल) अविनाश कातडे, एनटीपीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक (मनुष्यबळ) राजकुमार प्रजापती, जनसंपर्क अधिकारी समीरकुमार चिमण लाल, जिल्हा परिषद सदस्य भारती गोडबोले, शिवसेनेचे संदीप इटकेलवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.खा. तुमाने यांनी एनटीपीसीच्या दोन्ही अधिकाऱ्यांना विषयनिहाय प्रश्न विचारले. त्यावर राजकुमार प्रजापती यांनी आपण मौदा एनटीपीसी कार्यालयात नवीन असल्याने यासंदर्भात माहिती सांगतो, असे उत्तर दिले. ते टोलवाटोलवी करीत असल्याचे लक्षात आल्याने संतप्त झालेल्या खा. तुमाने यांनी प्रजापतींना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. ते बाहेर निघताच देवेंद्र गोडबोले आणि धामणगावचे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गोरले या दोघांनी प्रजापती यांच्याशी वाद घालून प्रजापती तसेच समीरकुमार यांना मारहाण केली.समीर लाल यांचा मोबाईलही फोडला. त्यामुळे या बैठकीला वेगळीच कलाटणी मिळाली. वातावरण तणावपूर्ण झाले होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी आढावा बैठक सोडून त्यांचे कार्यालय गाठले आणि संपूर्ण घटनाक्रम एनटीपीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. अधिकाऱ्यांना चक्क मारहाण करण्यात आल्याच्या वृत्ताने एनटीपीसीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. या प्रकाराचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदविला. एनटीपीसी आॅफिसर्स असोसिएशन तसेच एनटीपीसी वर्कर्स युनियनने जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन आरोपींना तातडीने अटक करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला होता.

पोलिसांकडे तक्रार, आरोपी फरारया प्रकरणी राजकुमार प्रजापती यांच्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी देवेंद्र गोडबोले व जितेंद्र गोरले यांच्याविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी आरोपी गोडबोले आणि गोरलेच्या अटकेसाठी धावपळ सुरू केली. आरोपींनी आपापले मोबाईल बंद करून ठेवल्याने पोलिसांनी त्यांच्या निकटस्थ व्यक्तींवर नजर रोखली.

अटकेची नाट्यमय घडामोडया घटनेला सात दिवस झाले. मात्र, आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. दुसरीकडे या प्रकरणामागचे नेमके कारणही चर्चेला आले होते. त्यानुसार, गोडबोलेंच्या अवैध धंद्यांना, अवास्तव मागण्यांना एनटीपीसीचे अधिकारी दाद देत नसल्याने गोडबोले त्यांच्यावर चिडून होते. त्यामुळे एनटीपीसीत आपला दबदबा निर्माण करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे चर्चेतून पुढे आले.दुसरीकडे सात दिवस होऊनही हाती लागत नसल्याने गोडबोलेंना अटक करण्यासाठी पोलिसांनी आपली शैली बदलवली होती. त्यानुसार, पोलिसांनी फरार असलेल्या गोडबोलेंची ‘व्यवस्था’ करणाऱ्या एका साथीदाराला शनिवारी रात्री ताब्यात घेतले. त्याला खास पद्धतीने ‘गरम ’केले. त्यानंतर त्याने गोडबोलेचा पत्ता सांगितला. त्यानुसार, रविवारी सकाळपासून गोडबोलेंच्या आजूबाजूला पोलिसांनी गराडा घालणे सुरू केले. त्याची कुणकुण लागताच गोडबोलेंनी मोबाईलवरून एक मेसेज व्हायरल केला. त्यात त्यांनी आपण पोलीस अधीक्षकांकडे आत्मसमर्पण करीत असल्याची माहिती दिली होती. प्रत्यक्षात आज रविवार असल्यामुळे आणि एसपी आॅफिस बंद असल्यामुळे आत्मसमर्पणाचा प्रश्नच नव्हता. ग्रामीण पोलिसांनी त्यांना नागपुरात नाट्यमयरीत्या अटक करून गोडबोलेंच्या कथित आत्मसमर्पणाचा डाव उधळला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना