शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने बडविला सरकार विरोधात ढोल

By admin | Updated: July 11, 2017 01:36 IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत शिवसेनेतर्फे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

जिल्हा बँकेसमोर आंदोलन : शेतकरी कर्जमाफीची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत शिवसेनेतर्फे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयासमोर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी ढोल बडविला. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र याची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने होत नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना बँकांच्या शाखेमध्ये जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे. त्यासाठी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये त्वरित प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.सोबतच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून किती शेतकऱ्यांनी कर्ज घेतले व किती जण कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसतात त्याची यादीदेखील देण्यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. कृपाल तुमाने, सतीश हरडे यांच्या नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजू हरणे, संदीप इटकेलवार, राजेंद्र हरणे प्रामुख्याने उपस्थित होते.