शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

शिवसेना व राष्ट्रवादीच्या हाती चावी

By admin | Updated: November 26, 2015 03:18 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आठ जागांसाठी २७ डिसेंबरला निवडणूक होत आहे.

हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा : स्थानिक पातळीवर शिवसेनेत खदखदनागपूर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आठ जागांसाठी २७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. नागपुरातही या निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या निवडणुकीत भाजप- शिवसेना तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीची युती असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक नेते हायकमांडच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. संख्याबळ पाहता भाजपची चाबी शिवसेनेच्या तर काँग्रेसची चाबी राष्ट्रवादीच्या हाती आहे. शिवसेना व राष्ट्रवादी युतीधर्माचे कितपत पालन करतात यावर नागपूरचा निकाल अवलंबून आहे. राज्यभरातील आठ जागांसाठी निवडणूक असल्यामुळे युती किंवा आघाडीबाबत प्रदेश स्तरावरच निर्णय घेतला जाणार आहे. असे असले तरी स्थानिक पातळीवर शिवसेनेत भाजपबाबत खदखद आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ऐनवेळी भाजप- सेनेची युती तुटली होती. निकालानंतरही भाजपने राष्ट्रवादीशी घरोबा केला. अध्यक्षपद स्वत:कडे तर उपाध्यपद राष्ट्रवादीला सोपविले. अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीने साथ सोडल्याने भाजपने जि.प.मध्ये सेनेला सोबत घेतले व उपाध्यक्षपद दिले. महापालिकेच्या निवडणुकीतही जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत सुटला नव्हता. शेवटी १८ जागांवर युती व काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपने राजकीय खेळी खेळत शिवसेनेला बाहेर ठेवत आघाडीची नोंदणी केली आणि शिवसेनेला उपमहापौरपद देण्याची परंपराही मोडीत काढली. भाजपने उपमहापौरही स्वत: कडेच ठेवले. अडीच वर्षांनी अपक्षाला उपमहापौरपद दिले पण शिवसेनेला संधी दिली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप- सेनेची युती होती. तेव्हा दोन्ही पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते काहीसे एकत्र आले. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेची कोंडी झाली. शिवसेनेचे एकमेव आमदार आशीष जैस्वाल यांना पराभवाला सामोरे जावे लागले व जिल्ह्यात शिवसेनेचे ‘अकाऊंट क्लोज’ झाले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नागपूर महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीत भाजपशी युती व्हावी, अशी शिवसेनेची ईच्छा होती. मात्र, भाजप नेत्यांनी अपेक्षित जागा देण्यास नकार देत ताणून धरले. शेवटी युती झाली नाही. सेनेला फटका बसला. ही सर्व खदखद शिवसेना नेते व कार्यकर्त्यांच्या मनात आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी नागपूरची माहिती मागविली आहे. शिवसेनेकडे ६२ मतदार आहेत. भाजपचे गणित बिघडवायला एवढी संख्या पुरेशी आहे. मात्र, नागपूरसह राज्यभरातील स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी जवळपास पक्की मानली जात आहे. काँग्रेसकडून अनंतराव घारड उमेदवार असताना राष्ट्रवादीने घात केला, असा काँग्रेसकडून पडद्यामागे आरोप केला जातो. मात्र, गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांना राष्ट्रवादीने साथही दिली होती. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळी लढली. याचा नागपूर शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा फटका बसला याची सल साष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री व विधानसभेचे उमेदवार हे सर्व किती सहजपणे विसरतात यावरही काँग्रेसचे बरेच काही अवलंबून आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना यावेळीही आघाडी अपेक्षित आहे. रीतसर घोषणा होईपर्यंत काही बोलणे योग्य होणार नाही, असे पक्षातर्फे नागपूरकरिता उमेदवार निवडीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख आ. विजय वडेट्टीवार यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. आघाडीबाबत दोन दिवसात मुंबईत निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली होती. या वेळीही राष्ट्रवादीची साथ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)