शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या पाच ओळीत शिवरायांचा इतिहास

By admin | Updated: December 17, 2014 00:30 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीत त्यांच्याच इतिहासाची सातत्याने अवहेलना करण्यात येत आहे. देशाबाहेरून आलेल्या मुघल सम्राटांना मोठी जागा देणाऱ्या ‘एनसीईआरटी’ने

‘एनसीईआरटी’च्या प्रतापांकडे अद्यापही दुर्लक्ष योगेश पांडे - नागपूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीत त्यांच्याच इतिहासाची सातत्याने अवहेलना करण्यात येत आहे. देशाबाहेरून आलेल्या मुघल सम्राटांना मोठी जागा देणाऱ्या ‘एनसीईआरटी’ने (नॅशनल कौन्सिल आॅफ एज्युकेशन रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग) इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची माहिती अवघ्या पाच ओळीत दिली आहे. पुस्तकात नगण्य स्थान दिल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत महाराजांच्या पराक्रमाचा गौरवशाली इतिहास योग्य तऱ्हेने पोहचत नसल्याचे चित्र आहे. राज्य शासन याबाबत पुढाकार घेऊन केंद्र व ‘एनसीईआरटी’ला इतिहासात बदल करायला भाग पाडणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.इयत्ता सातवीच्या ‘हमारे अतीत-२’ या इतिहास विषयाच्या पुस्तकातील बहुतांश पानांमध्ये भारतावर आक्रमण करणाऱ्या मुघल सम्राटांची माहिती मोठ्या प्रमाणात देण्यात आली आहे. परंतु लाखो नागरिकांचे आदर्श असलेल्या शिवरायांची माहिती अवघ्या पाच ओळीत छापण्यात आली आहे. निरनिराळ्या मुघल सम्राटांना स्वतंत्र स्थान देत असताना शिवाजी महाराज, पेशवे यांचा इतिहास ‘मराठा’ या शीर्षकाखाली दीड पानात संपविण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इतिहासाच्या या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे एकही छापील चित्र नाही. केंद्रातील हाच अभ्यासक्रम महाराष्ट्रातील अनेक शाळांत शिकवला जात असून, लाखो विद्यार्थी शिवरायांच्या इतिहासापासून वंचित राहत आहेत. यासंदर्भात गेल्या पाच वर्षांपूर्वीदेखील आवाज उठविण्यात आला होता. परंतु त्यासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा झाला नव्हता.राज्याच्या अस्मितेचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही फोटो ‘एनसीईआरटी’ला उपलब्ध होऊ नये, ही आश्चर्याची बाब आहे. ही राज्याच्या अस्मितेची बाब आहे. भाजपा-शिवसेनेच्या या सरकारने आपल्या अधिकारात या पुस्तकात बदल करावा. त्यांना पुस्तकात २५ टक्के बदल करण्याचा अधिकार आहे. हे शक्य नसेल तर कमीतकमी केंद्राकडे आक्षेप नोंदवून हा मुद्दा लावून धरावा, असे मत हिंदू जनजागरण समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केले. गोवा सरकारने २००९ सालीच या पुस्तकात बदल केला असल्याचा दावादेखील त्यांनी केला. यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.भारतमातेवर आक्षेप?याशिवाय इयत्ता दहावीच्या ‘भारत और समकालीन विश्व-२’ या पुस्तकात भारतमातेचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे. ज्या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी देशातील हुतात्म्यांनी जात-धर्म-पंथ यांना बाजूला सारत बलिदान केले, त्यावरून आक्षेपार्ह टीप लिहिण्यात आली आहे. हातात त्रिशूळ घेऊन सिंहाजवळ उभ्या असलेल्या भारतमातेचे चित्र देशातील सर्व पंथ-समुदायांच्या लोकांना मान्य होईल का, असा प्रश्न यात उपस्थित करण्यात आला आहे.