शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

शेषराव मोरे आणि अदिती हर्डीकर यांना संस्कार भारतीचा राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 14:47 IST

संस्कार भारतीच्या वतीने या वर्षापासून दिला दिल्या जाणारा 'स्व. डॉ. कल्पना व्यवहारे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार' जेष्ठ विचारवंत शेषराव मोरे आणि लेखिका अदिती जोगळेकर-हर्डीकर यांना प्रदान केला जाणार आहे.

ठळक मुद्दे'गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी' आणि 'कला व राष्ट्रविचार' या ग्रंथांची निवड'

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: संस्कार भारतीच्या वतीने या वर्षापासून दिला दिल्या जाणारा 'स्व. डॉ. कल्पना व्यवहारे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार' जेष्ठ विचारवंत शेषराव मोरे आणि लेखिका अदिती जोगळेकर-हर्डीकर यांना प्रदान केला जाणार आहे.राजहंस प्रकाशनाच्या शेषराव मोरे लिखित 'गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी' व विवेकानंद केंद्राच्या मराठी विभागाने प्रकाशित केलेल्या अदिती हर्डीकर लिखित 'कला आणि राष्ट्रविचार' या साहित्यकृतींची निवड यावर्षीच्या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.मानपत्र आणि १५००० रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून दि. ३ ऑगस्ट २०१९ रोजी विदर्भ संस्कार भारतीच्या वरोरा येथे आयोजित प्रांत अधिवेशनात तो समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त, प्रसिद्ध सिने अभिनेते सुनील बर्वे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचन गडकरी, संस्कार भारतीच्या प्रांताध्यक्ष सूरमणी प्रा.कमल भोंडे, महामंत्री आशुतोष अडोणी, सेंसार बोर्ड सदस्य चंद्रकांत घरोटे यावेळी उपस्थित राहणार आहेत.डॉ. कल्पना व्यवहारे उमरेडच्या कला वाणिज्य महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक होत्या. व्यासंगी वैचारिक व ललित लेखक म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांची कन्या सौ. वैशाली देशपांडे व दीपाली एकताटे यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार दिल्या जाणार आहे.यावर्षी दिल्या जाणारा पहिला पुरस्कार वैचारिक लेखनासाठी निश्चित करण्यात आला होता. रवींद्र देशपांडे, प्रकाश एदलाबादकर व डॉ. छाया नाईक यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीने पुरस्कारार्थ ग्रंथ निवड केली.प्रखर बुद्धिनिष्ठ,वैचारिक लेखनाचा प्रवाह समृद्ध करणारे मराठीतील एक सशक्त लेखक, विचारवंत म्हणून शेषराव मोरे यांची ख्याती आहे. स्वा. सावरकरांच्या विचारांचे चिकित्सक अभ्यासक आणि समर्थ भाष्यकार असणाऱ्या शेषराव मोरे यांनी १८५७ चा जिहाद, अप्रिय पण, काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?, काश्मीर एक शापित नंदनवन, प्रेषितानंतरचे पहिले चार आदर्श खलिफा, मुस्लिम मनाचा शोध, विचारकलह, सत्य आणि विपर्यास, सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद, सावरकरांचे समाजकारण आदी महत्वपूर्ण वैचारिक ग्रंथलेखन करून मराठी साहित्यात भरीव योगदान दिले आहे. अनेक पुरस्कार आणि सन्मानाचे धनी असलेल्या शेषराव मोरे यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासह अनेक व्यासपीठांवरून वैचारिक मंथन घडवले आहे.गांधीहत्येसंबंधात स्वा. सावरकरांवरील आधारहीन आरोपांचा अतिशय अभ्यासपूर्ण, साधार, संतुलित आणि खणखणीत समाचार 'गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी' या ग्रंथात मोरे यांनी घेतला आहे.जे. जे. स्कूल आॅफ आर्ट, मुंबई येथून कलापारंगत अदिती हर्डीकर उत्तम निवेदिका, सृजनशील चित्रकार व ललित लेखिका म्हणून परिचित आहेत. रचनात्मक शैक्षणिक उपक्रम राबविणा?्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी कार्य केले आहे. छात्र प्रबोधन, दै सकाळ, विवेक विचार व कला विषयक विविध नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे.स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांच्या कला विचारांचे समीक्षण करणारा आणि कलाविषयक भारतीय चिंतनाची मौलिकता विषद करणारा त्यांचा कला आणि राष्ट्रविचार हा ग्रंथ पदार्पणातच लक्षवेधी ठरला आहे.

टॅग्स :literatureसाहित्य