शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

-अन् त्याच फुलांनी तिचा सत्कार झाला!

By admin | Updated: June 19, 2014 01:00 IST

ती घरातली मोठी मुलगी. लहान वयातच घराची जबाबदारी स्वीकारावी लागली. काय करावे काहीच सुचेना. आजूबाजूला फुलांचे दुकान नव्हते. फुलासारख्या या मुलीने फुले विकण्याचा निर्णय घेतला.

नेहा मौंदेकर : फुले विकताना मिळविले यश नागपूर : ती घरातली मोठी मुलगी. लहान वयातच घराची जबाबदारी स्वीकारावी लागली. काय करावे काहीच सुचेना. आजूबाजूला फुलांचे दुकान नव्हते. फुलासारख्या या मुलीने फुले विकण्याचा निर्णय घेतला. लोकांना ही गरजेची बाब होतीच. हळूहळू या फुलांनीच तिला सावरले. फुले विक्रीतून आलेल्या पैशांवर घर चालवायचे आणि थोडासा पैसा शिक्षणासाठी खर्च करायचा. जिद्द होतीच आणि त्याला परिश्रमाचीही जोड. दहावीच्या परीक्षेचा अभ्यास सुरू होता. फुलांचे हार करताना अभ्यासाचाही एक-एक मुद्दा ती डोक्यात माळत राहिली. ती आता महापालिकेच्या शाळेतून प्रथम आली आहे. नेहा मौंदेकरला या यशाचे समाधान आहे. सोयी, सुविधा मिळाल्यावर फक्त अभ्यास करणे आणि गुणवत्तेत येणे हे फार मोठे आव्हान नाही. पण परिस्थितीला शरण न जाता जिद्दीने यशाकडे झेपावणे कठीण असते. त्यासाठी निग्रह लागतो. प्रबळ इच्छाशक्ती लागते. नेहाने या भरवशावरच यशाची माळ गळ्यात घातली. ज्या फुलांचे हार तयार करून ती विकते, त्या फुलांनीच आज तिच्या सत्काराने कृतकृत्यता मानली. मानेवाडा बेसा रोडवर एका छोट्याशा दुकानात ती फुलांची विक्री करते. पूर्वी हा व्यवसाय तिचे वडील करायचे. पण अचानक ते आजारी पडले. वडिलांच्या हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. उपचारासाठी पैसे नाहीत आणि कुणी मदतीला नाही. कुटुंबावर आघात झाला. वडिलांना काम करू द्यायचे नाही अन्यथा त्यांना धोका होऊ शकतो, असेही डॉक्टरांनी सांगितले. यावर उपाय काढणे गरजेचे होते. मोठी मुलगी म्हणून हा व्यवसाय करण्याची जबाबदारी नेहाने स्वीकारली. आई घर सांभाळते आणि नेहा व्यवसाय. दिवसाला मिळणाऱ्या पैशांमधून कसेबसे घर चालते. पुस्तके आणि गणवेश महापालिकेच्या शाळेतूनच मिळतो. इतर खर्च मात्र करावा लागतो. वडिलांच्या उपचारासाठी पैसे नाहीत पण हे आव्हानही स्वीकारायचे आहे. यात लहान भावाचीही जबाबदारी तिच्यावर आहे. शिक्षक असलेल्या मामांनी मदत केली. त्याप्रमाणेच मुख्याध्यापिका वैशाली चेडे यांच्या सहकार्याने हे यश मिळविता आले, असे ती म्हणाली. तिच्या या यशाने तिच्या आईवडिलांना समाधान लाभले. यापुढे अभियंता होण्याची इच्छा असलेल्या नेहाने त्यासाठी सर्व परिश्रमाची तयारी ठेवली आहे.