शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
2
"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा
3
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
4
समोश्यावरून वाद सुरू झाला अन् तलवारीच बाहेर निघाल्या! शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसर हादरला
5
Video : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान अपघात; हेलिकॉप्टर उतरताच हेलिपॅड खचले, थोडक्यात टळली दुर्घटना 
6
"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी
7
चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?
8
प्रायव्हसी धोक्यात? 'Apple Maps' गुपचूप ट्रॅक करतंय तुमची प्रत्येक लोकेशन! लगेच बंद करा 'ही' सेटिंग
9
IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा
10
Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!
11
लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर
12
PPF vs FD: पीपीएफ की एफडी, कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल मोठा फायदा? कोणता पर्याय करुन देऊ शकते तुफान कमाई
13
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
14
'या' शेअरमध्ये १८ महिन्यांत ६३०००% ची तेजी; आता BSE नं वाजवली धोक्याची घंटा, क्रिकेटरचंही जोडलेलं नाव
15
Hardik Pandya Mahieka Sharma Look ... अन् पांड्याची 'हॉट अँण्ड बोल्ड' गर्लफ्रेंड झाली 'संस्कारी'
16
अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.."
17
Gold Silver Price Drop: सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले; ४ वर्षातील सर्वात मोठी घसरण, काय आहे यामागचं कारण
18
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
19
का रे दुरावा? सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या नात्यात बिनसलं, दिवाळीलाही एकत्र दिसलं नाही जोडपं
20
ट्रम्प यांचा PM मोदींशी फोनवरून संवाद; ट्रेडवर चर्चा, रशियन तेल खरेदीसंदर्भा पुन्हा मोठा दावा!

तिने घेतली रेल्वेसमोर उडी... नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 00:48 IST

एका महिलेने रेल्वे रुळावर उडी घेऊन सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. लोकोपायलटने वेळीच गाडी थांबविली. त्याच वेळी एका तरुणाने महिलेला फलाटावर ओढले.

ठळक मुद्दे प्रवाशाने ओढले प्लॅटफार्मवर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एका महिलेने रेल्वे रुळावर उडी घेऊन सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. लोकोपायलटने वेळीच गाडी थांबविली. त्याच वेळी एका तरुणाने महिलेला फलाटावर ओढले. जीवाचा थरकाप उडविणारी ही घटना सोमवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली.मोमिनपुरा येथील रहिवासी कल्पना (वय ५५, बदललेले नाव) सोमवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर आली. ती प्लॅटफार्म क्रमांक ६ वर मुंबई एण्डच्या दिशेने गेली. त्याच वेळी २२६२० तिरुनेलवेल्ली-बिलासपूर एक्स्प्रेस प्लॅटफार्मवर येत होती. प्रवासी गाडीच्या प्रतीक्षेत होते. कल्पनाही प्रवाशांसह प्लॅटफॉर्मवर थांबली होती. गाडी स्टेशनच्या आत पोहोचली. गाडी जवळ येत असतानाचे पाहून कल्पनाने रेल्वे रुळावर उडी घेतली. लोकोपायलट आर.पी. सरदार, सहायक लोकोपायलट डी. मंडल यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच ब्रेक लावला. काही वेळातच गाडी थांबली. गाडी थांबली तेव्हा कल्पना आणि गाडी यांच्यातील अंतर केवळ एक ते दीड फुटाचे होते. त्याच वेळी जरीपटका निवासी राम पंजवानी हा तरुण वडिलांना सोडायला आला असता त्याने कल्पनाला मदतीचा हात देऊन प्लॅटफार्मवर ओढले. घटनेची माहिती मिळताच उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव आणि सतीश ढाकणे यांनी लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाला सूचना दिली. त्यानुसार लोहमार्ग पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संजय पटले घटनास्थळी पोहोचले. महिलेला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. कल्पनाला एक मुलगा आहे. ती तणावात घरून निघाल्याचे समजते. काही वेळानंतर ती शांत होताच लोहमार्ग पोलिसांनी तिला घरी पोहोचविले.दरम्यान, आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक चंद्रभान अहिरवार, एस. पी. सिंग प्लॅटफॉर्मवरून जात असताना त्यांनी महिलेची आस्थेनी विचारपूस करून तिला दिलासा दिला. गाडीचे गार्ड ए.के. चौधरी यांनीही कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला.लोहमार्ग पोलिसांची माहिती देण्यास टाळाटाळसोमवारी संबंधित महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लोहमार्ग पोलिसांनी तिला ठाण्यात आणून चौकशी केली. त्यानंतर तिला तिच्या घरी पोहोचविले. परंतु याबाबत प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी लोहमार्ग पोलिसांना विचारणा केली असता असे काहीच झाले नसल्याचे सांगितले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता ही घटना अतिशय किरकोळ असल्याचे सांगून हात झटकले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरWomenमहिला