शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या दुचाकीवर बसून ‘ती’ सुसाट गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 10:29 IST

पतीसमोर आपल्या प्रियकराच्या दुचाकीवर बसून एक नवविवाहिता पळून गेली. शनिवारी दुपारी ११.३० ते १२ च्या सुमारास गणेशपेठ बसस्थानक परिसरात ही अफलातून घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पतीसमोर आपल्या प्रियकराच्या दुचाकीवर बसून एक नवविवाहिता पळून गेली. शनिवारी दुपारी ११.३० ते १२ च्या सुमारास गणेशपेठ बसस्थानक परिसरात ही अफलातून घटना घडली.अमोल डोंगरे (वय २५) असे नवविवाहितेला तिच्या पतीसमोरून पळवून नेणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो अजनीच्या इंदिरानगरात राहतो. अमोलचे २१ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तिचे महिनाभरापूर्वी दुसºया एका तरुणासोबत लग्न झाले. काही दिवसांपूर्वी ती माहेरी आली. पाहुणपण झाल्यानंतर ती तिच्या पतीसोबत सासरी जाण्यासाठी रेल्वेस्थानकाकडे निघाली. हे नवदाम्पत्य रेल्वेस्थानकाकडे जात असताना शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास आरोपी अमोल त्यांच्याजवळ आला. त्याने रेल्वेगाडीला विलंब असल्याची थाप मारून बसने गावाला जाण्याचा सल्ला देत त्या दोघांना गणेशपेठ बसस्थानकावर आणले. तेथे त्याने आपली मोटरसायकल उभी केली. प्रेयसीच्या पतीच्या हातात एक तिकीट दिले. त्याला गावाला परतण्याचा सल्ला देऊन आरोपी अमोलने आपल्या प्रेयसीला दुचाकीवर बसवले. ती देखिल त्याचीच वाट बघत असल्याप्रमाणे अमोलच्या दुचाकीवर बसली आणि ते दोघे सुसाट वेगाने पळून गेले. या प्रकारामुळे पतीला प्रचंड मानसिक धक्का बसल्याने बराच वेळ तो बसस्थानक परिसरात फिरत राहिला. नंतर त्याने सासरच्यांना या प्रकाराची माहिती देऊन त्यांच्या मदतीने गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी अमोलविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट