शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

१५ व्या वर्षीच बनली ती गर्भवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रेमसंबंधाच्या नावाखाली एका १६ वर्षीय मुलाने शेजारच्या एका १५ वर्षीय मुलीला गर्भवती बनवले. विशेष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रेमसंबंधाच्या नावाखाली एका १६ वर्षीय मुलाने शेजारच्या एका १५ वर्षीय मुलीला गर्भवती बनवले. विशेष म्हणजे, सहा महिन्यांची गर्भवती होऊनही आतापर्यंत घरच्या वा बाहेरच्या कुणाच्याच लक्षात हा प्रकार आला नव्हता. मेडिकलच्या डॉक्टरांनी माहिती दिल्यानंतर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही खळबळजनक घटना शुक्रवारी उजेडात आली.

सोनू (काल्पनिक नाव, वय १५ वर्षे) ही दहावीची आणि टिनू (काल्पनिक नाव, वय १६) हा ११ वी चा विद्यार्थी. हे दोघे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजारी राहतात. दोघांच्याही घरची परिस्थिती अतिशय सामान्य. शेजारीच राहत असल्याने त्यांच्यात बोलाचाली होतीच. वर्षभरापूर्वी त्याने तिला प्रपोज केले. घरची मंडळी मजुरीच्या निमित्ताने बाहेर जात असल्यामुळे त्यांना रान मोकळं होतं. त्यामुळे सैराट झालेल्या या दोघांनी साऱ्या मर्यादा ओलांडल्या. सहा महिन्यांपासून ते पती-पत्नीसारखे नेहमीच शरीरसंबंध जोडू लागले. त्यामुळे व्हायला नको तेच झाले. तिच्या उदरात बाळ वाढू लागले. गर्भ चक्क सहा महिन्यांचा झाला. मात्र कुणालाच त्याचा थांगपत्ता नव्हता. गुरुवारी मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे आत्याने तिला मेडिकलमध्ये नेले. महिला डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌ त्या चक्रावल्या. या १५ वर्षाच्या मुलीच्या पोटात सहा महिन्यांचा गर्भ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तिच्या आत्याला ही माहिती दिली. पोलिसांनाही कळविले. त्यानुसार गुरुवारी रात्री पोलीस मेडिकलमध्ये पोहोचले. त्यांनी सोनूची विचारपूस केली. तिने तिची प्रेमकथा सांगितली. घराशेजारी राहणाऱ्या टिनूसोबत तिचे एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. ऑक्टोबर २०२० मध्ये कोरोनाचा कहर कमी झाल्याने मुलीचे नातेवाईक रोजीरोटीच्या निमित्ताने बाहेर जात होते. ही संधी साधून टिनू सोनूच्या घरी यायचा आणि हे दोघं शरीरसंबंध प्रस्थापित करायचे. गेल्या सहा महिन्यांपासून हे त्यांचे सुरू होते. गर्भधारणा होईल किंवा अजून काय, याबाबत दोघांनाही माहिती होती की नाही, ते कळायला मार्ग नाही. मात्र ते दोघेही बिनधास्त होते. त्यामुळे तिच्या पोटातील गर्भ वाढता वाढता वाढत गेल्याचे उघड झाले. तिचे बयान लिहून घेतल्यानंतर कोतवाली पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. टिनूला शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर त्याला सुधारगृहात पाठविण्याची तयारी पोलीस करीत होते.

---

आता पुढे काय ?

सोनूच्या डोक्यावर आई-वडिलांचे छत्र नाही. ती तिची आत्या आणि आजीच्या आधाराने राहत आहे. तिच्या चुकीमुळे अल्पवयीन असतानाच तिच्या पदरी मातृत्व आले आहे. पोटातील गर्भ सहा महिन्यांचा असल्यामुळे तिचा गर्भपात शक्य नाही. तो करण्याचा प्रयत्न केल्यास तिचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे आता पुढे काय, असा प्रश्न तिच्या नातेवाईकांना, तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आणि पोलिसांनाही पडला आहे.

---

आरोपी म्हणतो... मी लग्न करेन!

आरोपीसुद्धा अल्पवयीनच नाही, तर बेजबाबदारही आहे. त्याच्या घरची परिस्थितीही गरीब आहे. पोलिसांनी शुक्रवारी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ''कुछ नही होता. मै शादी करूंगा..!'' असे बालिश उत्तर त्याने पोलिसांना दिले आहे.

---