शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:43 IST

राज्यात सत्ता स्थापनेच्या झालेल्या हालचाली व त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १४ नोव्हेंबरला विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यात सत्ता स्थापनेच्या झालेल्या हालचाली व त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १४ नोव्हेंबरला विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा राजकीय नसून परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी आहे.विदर्भात सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शरद पवार हे पूर्व विदर्भात हे पाहणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना भरीव मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अगोदरपासूनच आग्रही भूमिकेत आहेत. यापूर्वीही शरद पवार यांनी मराठवाडा व महाराष्ट्राच्या इतर भागात बांधावर जाऊन शेतपिकाची पाहणी केली होती. पवार हे आता पूर्व विदर्भातील धान, कापूस, सोयाबीन, संत्रा व मोसंबीची पाहणी करणार आहेत.१४ नोव्हेंबरला पीक पाहणीचा कार्यक्रम झाल्यानंतर १५ नोव्हेंबरला पवार हे नागपूर येथील कडबी चौकस्थित मेकोसाबाग शाळेच्या मैदानावर बिरसामुंडा जयंतीनिमित्त आदिवासी बचाव आंदोलनचे राष्ट्रीय संरक्षक सतीश पेंदाम यांच्या वतीने दुपारी २ वाजता आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार हेसुद्धा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पूर्व विदर्भात १४ नोव्हेंबरला येत आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारVidarbhaविदर्भ