शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संपदा देशमाने, श्रुती तिडके सोनल जोगदंड चमकले

By admin | Updated: August 29, 2014 01:00 IST

लोकमत कॅम्पस क्लब (बाल विकास मंच) व स्व. दौलतराव ढवळे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतर शालेय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संपदा धीरज देशमाने

निबंध स्पर्धा : कॅम्पस क्लब व दौलतराव ढवळे संस्थेचे आयोजननागपूर : लोकमत कॅम्पस क्लब (बाल विकास मंच) व स्व. दौलतराव ढवळे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतर शालेय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संपदा धीरज देशमाने (श्री सत्यसाई कॉन्व्हेंट, ५००० रुपये रोख, प्रमाणपत्र व मानचिन्ह), द्वितीय श्रृती चिंतामण तिडके (विदर्भ बुनियादी हायस्कूल, इयत्ता ६ वी, ३००० रुपये रोख, प्रमाणपत्र व मानचिन्ह तर तृतीय क्रमांक सोनल प्रकाश जोगदंड, (हडस हायस्कूल, इयत्ता ८ वी, २००० रुपये रोख, प्रमाणपत्र व मानचिन्ह) हिने पटकावले. तनिष्का काकडे (पंडित बच्छराज विद्यालय, इयत्ता ६ वी, प्रमाणपत्र व मानचिन्ह) आणि सृष्टी महिंद्र रोडे (तेजस्विनी विद्या मंदिर, वर्ग ८ वा, प्रमाणपत्र व मानचिन्ह) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. मी पंतप्रधान झालो तर व विशुद्ध पर्यावरण, एक सामाजिक जबाबदारी हे निबंधाचे विषय होते.स्पर्धेसाठी जवळपास शहरातील १०० ते १५० शाळांतील विद्यार्थ्यांनी हजारोंच्या संख्येत निबंध पाठविले होते. दोनपैकी एका विषयावर विद्यार्थ्यांना २०० शब्दात निबंध लिहायचा होता. यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मी पंतप्रधान झालो तर... या विषयावर आपल्या भावना मोकळ्या केल्या. त्यांच्या बुद्धीच्या मानाने आपला देश कसा असायला हवा किंवा कोणकोणते नियम लावले पाहिजेत तसेच देशात जो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे, तो थांबविणे किती गरजेचे आहे व त्यावर काय उपाय केले पाहिजेत, हेसुद्धा मुलांनी स्पष्ट केले. तसेच विशुद्ध पर्यावरण एक सामाजिक जबाबदारी या सामाजिक विषयावर विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपले विचार मांडले. निबंध स्पर्धेचे परीक्षण रश्मी वाटाणे यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम १ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता श्री दौलतराव ढवळे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या श्री सत्य साई कॉन्व्हेंटमध्ये होईल. अधिक माहितीकरिता लोकमत कॅम्पस क्लब, लोकमत भवन, नागपूर येथे मोबाईल ९८२२४०६५६२ / ८४२१९५२१६७ वर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)