शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखखानसह दोघांना जामीन नाकारला

By admin | Updated: January 19, 2017 02:48 IST

पतंग पकडण्यावरून झालेल्या भांडणाचा सूड म्हणून एकाचा खून तर दुसऱ्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या दोन जणांचा

सत्र न्यायालय : पतंग पकडण्यावरून खुनाचे प्रकरण नागपूर : पतंग पकडण्यावरून झालेल्या भांडणाचा सूड म्हणून एकाचा खून तर दुसऱ्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या दोन जणांचा जामीन अर्ज बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. शाहरुखखान सय्यद सरदारखान (१९) आणि शेख चांद शेख मोहम्मद (१९) दोन्ही रा. मोठा ताजबाग, अशी आरोपींची नावे आहेत. शेखर दामोदर वडतकर (३०) रा. जुनी बिडीपेठ, असे मृताचे नाव होते. खुनाची ही घटना गतवर्षी १५ जानेवारी २०१६ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आशीर्वादनगर येथील मोकळ्या मैदानात घडली होती. प्रकरण असे की, या प्रकरणातील जखमी सागर रामदास गायकवाड (३०) रा. जुनी बिडीपेठ हा त्याचा मित्र शेखर वडतकर याच्यासोबत पतंग उडवीत होता. त्याच वेळी एक पतंग कटून येत असताना त्याला पकडण्यावरून शेखरचे ताजबाग येथील दोन मुलांसोबत भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून या दोघांनी आपले आणखी सात साथीदार आणले होते. हे सर्व जण तीन मोटरसायकलींवर आले होते. त्यांनी या दोघांवरही सशस्त्र हल्ला करून शेखर वडतकर याचा जागीच खून केला होता, तर सागर गायकवाड याला गंभीररीत्या जखमी केले होते. सागरच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०२, ३०७, १२० (ब), १४३, १४४, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हे दाखल करून नऊ जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी चार जण विधिसंघर्षग्रस्त बालके होती. कारागृहात असलेल्या या दोन आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला असता, प्रकरण गंभीर असल्याने न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक डी. एम. चंदन हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)