शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांना माजी सैनिकांचे अभिवादन

By admin | Updated: July 28, 2016 02:43 IST

कारगील विजय’ ही भारतीय सैन्याची शौर्यगाथा. हा दिवस प्रत्येक भारतीयांची मनात सैन्यांप्रति आदर वाढविणारा.

उपराजधानीत कारगील विजय दिवस उत्साहात नागपूर : ‘कारगील विजय’ ही भारतीय सैन्याची शौर्यगाथा. हा दिवस प्रत्येक भारतीयांची मनात सैन्यांप्रति आदर वाढविणारा. मंगळवारी कारगील विजय दिवस नागपुरातही विविध संघटनांच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र माजी वायुसैनिक कल्याण संघटनेच्यावतीने अजनी चौक, वर्धा रोडवरील शेरमन रणगाड्याजवळ सैनिकांना अभिवादन करून विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध माजी सैनिक संघटना, सैन्य अधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघटना, महिला सैनिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. येथील अमरज्योतीवर पुष्पचक्र अर्पण करून कारगील युद्धातील शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी एका दहशतवाद्याला मारल्यामुळे पाकिस्तानाने काळा दिवस पाळला होता. पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध करीत याच ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यरात्री फटाके फोडून भारतीय सैन्याच्या कारवाईला जोरदार पाठिंबा जाहीर केला होता. कारगील विजयदिनीही या घटनेची आठवण करीत पाकिस्तानविरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली. निवृत्त झालेल्या या सैनिकांनी पुन्हा सैन्यात सामील होऊन शत्रू राष्ट्राला आजही उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी सांगितले.सीमेबाहेरून शेजारील राष्ट्राच्या सैनिकांच्या किंवा दहशतवाद्यांच्या घुसखोऱ्या असोत की देशांतर्गत आपत्ती असो, भारतीय सैन्याने प्रत्येक वेळी आपल्या कामगिरीने देशवासीयांची मान गर्वाने उंचावली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कारगील युद्धातील जवानांची शौर्यगाथा त्याचेच प्रतीक होय. हा दिवस म्हणजे अभिमानाने ताठ मान करावी अशी भारतीय जवानांनी देशवासीयांना दिलेली संधी होय, असे प्रतिपादन प्रीती घारड यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)