शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या षष्ठ्यब्दीपूर्तीला शहा, पवार, शिंदे येणार

By admin | Updated: May 12, 2017 02:50 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी हे २७ मे रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती : सिने कलावंतांचीही हजेरी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी हे २७ मे रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्त कस्तूरचंद पार्क येथे सायंकाळी ६ वाजता त्यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आध्यात्मिक संत श्री श्री रविशंकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन गडकरी यांचा सत्कार केला जाईल. या भव्य सोहळ्याला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी, सिने कलावंत आदी उपस्थित राहतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंघ रावत, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याच्या आयोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री नितीन गडकरी षष्ठ्यब्दीपूर्ती गौरव समारोह समितीचे कार्याध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. संयोजक ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहसंयोजक वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी हे आहेत. सोहळ्यासाठी भाजपातर्फे जय्यत तयारी सुरू आहे. नागपूर, विदर्भासह राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील.