शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वंचितांच्या डोक्यावर धरली दातृत्वाची सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 01:44 IST

माणसांमधील माणुसकी माणुसकीनेच जपली जावी अन् आपापसातील आत्मीयता आपुलकीने टिकावी, हा उद्देश समोर ठेवून समाजऋण जपणाºया व्यक्ती आजही समाजात आहेत.

ठळक मुद्देउमाळकर दाम्पत्याचे औदार्य आरोग्य, शिक्षण क्षेत्रात कार्यरत संस्थांना दिली ५० लाखांची देणगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माणसांमधील माणुसकी माणुसकीनेच जपली जावी अन् आपापसातील आत्मीयता आपुलकीने टिकावी, हा उद्देश समोर ठेवून समाजऋण जपणाºया व्यक्ती आजही समाजात आहेत. हीच माणुसकी वंचित, गोरगरिबांच्या आयुष्याचा आधार ठरली आहे. समाजऋणाचा हा वारसा पुढेही सुरू राहावा या उद्देशाने रामनगरातील बळवंतराव उमाळकर आणि सुषमा उमाळकर या दाम्पत्याने मदतीचा हात पुढे केला आहे. लाख-दोन लाखांची नव्हे तर तब्बल ५० लाख रुपयांची देणगी या दाम्पत्याने सामाजिक संस्थांसाठी देऊन आदर्श निर्माण केला आहे.गरजूंसाठी मदतीचा आधार ठरलेल्या अनेक संस्था सामाजिक सेवेचा वसा जपून आहेत. कुठलीही अपेक्षा न ठेवता सेवारत असणाºया अशा संस्थांना या दाम्पत्याने ही मदत दिली आहे. त्यात शेगावातील श्री संत गजानन महाराज संस्थान, स्व. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था संचालित एकलव्य एकल विद्यालय, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, खापरी नागपूर, शेतकरी संघटना, आंबेठाण येथील शेतकरी ट्रेनिंग सेंटर आणि अमरावती येथील डॉ. अविनाश सावजी संचालित प्रयास या संस्थांचा समावेश असून, घटस्थापनेच्या दिवशी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या देणगीचे वितरण या संस्थांना करण्यात आले.बळवंतराव उमाळकर सध्या नागपुरात राहतात. ते मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रचंड मेहनतीने त्यांनी शेती व्यवसायात लौकिक मिळविला.ते अंकुर सीडस् प्रा.लि. कंपनीचे संस्थापक संचालक आहेत. कोणतेही औपचारिक शिक्षण नसतानाही गेली ४० वर्षे ते या कंपनीचा आर्थिक व प्रशासकीय कार्यभार यशस्वीपणे सांभाळत आहेत. गडकरी यांनी उमाळकर परिवाराचे कौतुक करीत असे उदाहरण समाजाला प्रेरणा देत असतात, असे मनोगत व्यक्त केले.सीए दिलीप रोडी यांनी प्रास्ताविकातून उमाळकर कुटुंबीयांच्या दातृत्वाचा गौरव केला. याप्रसंगी आमदार परिणय फुके, नगरसेविका परिणिता फुके, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप, सरोज काशीकर, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन खापरीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, प्रयासचे डॉ. अविनाश सावजी, स्व. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था एकलव्य एकल विद्यालयाचे राजीव हडप व प्रशांत बोपर्डीकर तसेच अंकुर सीडस्चे प्रबंध संचालक माधवराव शेंबेकर, मकरंद सावजी (विपणन संचालक), अ‍ॅडव्हिजनचे रवींद्र कासखेडीकर, विजय व विशाल उमाळकर तसेच चंदन काशीकर व जयंत व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.