शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा लैंगिक शोषण: आरोपीला अटक

By admin | Updated: May 3, 2014 16:45 IST

वासनांध भावाने चुलत बहिणीवरच लैंगिक अत्याचार करून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे. नंंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नागपूर : वासनांध भावाने चुलत बहिणीवरच लैंगिक अत्याचार करून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे. नंंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.आरोपी संजय (२०) (काल्पनिक नाव) हा बारावीचा विद्यार्थी आहे, तर पीडित मुलगी ही त्याची चुलत बहीण असून ती दहावीत आहे. दोन्ही कुटुंबे वडिलोपार्जित एकाच इमारतीत राहतात. खालच्या भागात संजयचे तर वरच्या भागात पीडित मुलीचे कुटुंब राहते. मुलीचे आई-वडील सकाळी कामावर जातात तर इतर भावंड सकाळी ९ वाजता शाळेत जातात. मुलगी दुपारी १२ वाजता शाळेसाठी बाहेर पडते. सकाळी ९ ते दुपारी १२ या काळात संजयने मुलीवर अत्याचार केला. ऑगस्ट २०१३ पासून हा किळसवाणा प्रकार सुरू होता. त्यातून मुलगी गर्भवती झाली. ही बाब संजयच्या आई-वडिलांना समजली. त्यांनी दीड महिन्यापूर्वी तिला गर्भपात करायला लावला. दरम्यान मुलीच्या वागणुकीत अचानक झालेल्या बदलाने तिच्या आई-वडिलांना संशय आला. चौकशीत मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर बुधवारी त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार पाहून पोलिसही थक्क झाले. त्यांनी आरोपी संजयविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मुलीला जबरदस्तीने गर्भपात करण्यासाठी बाध्य केल्याच्या आरोपावरून संजयच्या आई-वडिलांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चार वर्षांपूर्वी संजयने पाचपावलीत एका कोचिंग क्लासच्या अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला केला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र अल्पवयीन असल्याने तो न्यायालयातून बचावला. संजय विकृत मनोवृत्तीचा असल्याचा संशय आहे. नंदनवनवर नजरबलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे नंदनवन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी चिंतित आहेत. सोमवारी एका अल्पवीयन मुलीच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण उघड झाले. त्यानंतर बापानेच सावत्र मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले. आता चुलतभावानेच लैंगिक अत्याचार करण्याची घटना घडली आहे. (प्रतिनिधी)