शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सेक्स रॅकेट चालविणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:17 IST

विदर्भात मोठे सेक्स रॅकेट चालविणारा आणि गेल्या दोन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात आरोपी कुमार ऊर्फ दिलीप शिवाजी गुळवे (वय ४१) याच्या शनिवारी पहाटे दौलताबाद औरंगाबाद हाय वे वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मुसक्या बांधल्या.

ठळक मुद्देऔरंगाबादजवळ पकडले : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात मोठे सेक्स रॅकेट चालविणारा आणि गेल्या दोन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात आरोपी कुमार ऊर्फ दिलीप शिवाजी गुळवे (वय ४१) याच्या शनिवारी पहाटे दौलताबाद औरंगाबाद हाय वे वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मुसक्या बांधल्या.ठिकठिकाणच्या वारांगनांना बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारा गुळवे पाहिजे तेथे, पाहिजे त्याला वेश्या पुरवित होता. ७ जूनला त्याने अशाच प्रकारे कोलकाता येथील एका वारांगनेसह तिघींना धरमपेठमधील छोटा लाहोरी बार चौकात वेश्याव्यवसायासाठी पाठविले होते. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) तेथे छापा मारून तीन वारांगनांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी सेक्स रॅकेट चालविणारा गुळवे पळून गेला होता. एसएसबीचे पोलीस त्याचा ठिकठिकाणी शोध घेत होते. तो औरंगाबादला पॉवररूम चौक, उतरानगरी येथे संतोष लक्ष्मण काथार यांच्याकडे राहत असल्याची माहिती कळाल्याने गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनानुसार एसएसबीचे पथक औरंगाबादला पाठविण्यात आले. या पथकाने शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास आरोपी गुळवेला जेरबंद केले. त्याला आज नागपुरात आणण्यात आले. एसएसबीचे वरिष्ठ निरीक्षक उमेश बेसरकर,सहायक निरीक्षक अनुपमा जगताप, पोलीस उपनिरीक्षक स्मिता सोनावणे, एएसआय दामोधर राजूरकर, अजय जाधव, हवलदार विजय गायकवाड, शिपायी छाया राऊत आणि प्रल्हाद डोळे आदींनी ही कामगिरी बजावली.गोव्यातही कनेक्शनआरोपी गुळवे गेल्या अनेक वर्षांपासून वेश्याव्यवसाय चालवितो. त्याच्या रॅकेटमधील नागपूर-विदर्भच नव्हे तर विविध प्रांतातील वारांगना आणि त्यांचे दलाल आहेत. त्याचे कनेक्शन पश्चिम बंगाल, गोवा तसेच ठिकठिकाणच्या दलालांसोबत आहे. तो ग्राहकांच्या मागणीनुसार, महागड्यातील महागड्या वारांगना बोलवून देतो.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटArrestअटक