शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाचे परिणाम देशासाठी घातक

By admin | Updated: September 27, 2015 02:39 IST

शासकीय नोकरदार वर्गाकडून कुठलीही मागणी झाली नसतानाही शासनाने सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे.

जनमंचचा जनसंवाद : संघटित-असंघटितांतील दरी आणखी वाढणार नागपूर : शासकीय नोकरदार वर्गाकडून कुठलीही मागणी झाली नसतानाही शासनाने सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. याअंतर्गत शासकीय नोकरदारांच्या वेतनात ३० पटीने वाढ होणार आहे. एकीकडे संघटित असलेल्या शासकीय नोकरदारांचे वेतन भरमसाट वाढविले जात आहेत. दुसरीकडे शेतकरी, शेतमजुरांसह एकूणच असंघटितांचे काय? सहाव्या वेतन आयोगामुळे आधीच संघटित व असंघटितांमध्ये शासनाने प्रचंड अशी दरी निर्माण करून ठेवली आहे. सातव्या वेतन आयोगामुळे ही दरी आणखी वाढणार आहे. त्याचे परिणाम देशासाठी घातक ठरतील, असा धोक्याचा इशारा जनमंचच्या जनसंवाद या कार्यक्रमाद्वारे उपस्थित मान्यवरांनी दिला.जनमंच या सामजिक संघटनेद्वारे रामदासपेठ येथील ‘विष्णुजी की रसोई’ येथे सायंकाळी ‘सातवा वेतन आयोग आणि शेतकरी’ या विषयावर जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक मुख्य अतिथी होते. जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, उपाध्यक्ष प्रमोद पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रा. शरद पाटील यांनी अतिशय रोखठोक मत व्यक्त केले. संघटित शक्तीच्या भरवशावर नोकरदार असे लाभ पदरात पाडून घेत आहेत. ही कायद्यात बसवून करण्यात आलेली लूट आहेत. त्यासाठी ‘ब्लॅकमेल’ केले जात आहे. तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी त्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. सुधीर पाठक म्हणाले, राजकीय पक्ष हे केवळ मताला घाबरतात. शासकीय नोकरदार वर्ग हे संघटित आहेत म्हणूनच त्यांना न मागता सर्वकाही मिळते. सातव्या वेतन आयोगाचा लाभ हा केवळ २ टक्के नोकरदार व पेन्शनर्स वर्गाला मिळणार आहे. संघटित नोकरदाराला सर्व लाभ हवे, परंतु निर्बंध नव्हे. शासकीय नोकरवर्गाला वेतनवाढ देत असताना त्याच्या कामाचे कुठे तरी मूल्यमापनही झाले पाहिजे. अ‍ॅड. अनिल किलोर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की, आम्ही नोकरदार वर्गाच्या विरोधात नाही, परंतु शेतकऱ्यांचाही विचार केला जावा. शेतकरी एकजूट नाही तो दबाव निर्माण करू शकत नाही म्हणून शासनाने त्याचा विचारच करू नये का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संचालन राजीव जगताप यांनी केले. (प्रतिनिधी)