शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सात जणांनी लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:11 IST

कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्णधाम, वॉक्स कुलरमागे राहणारा रोशन पुनाजी भलावी (वय २६) याने सोमवारी दुपारी ३.३०च्या सुमारास गळफास ...

कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्णधाम, वॉक्स कुलरमागे राहणारा रोशन पुनाजी भलावी (वय २६) याने सोमवारी दुपारी ३.३०च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.

गिट्टीखदानमधील पिटेसूरच्या सागवान पहाडीवर एका पळसाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेत ताज इस्माईल शेख (वय ३०, रा. वाठोडा) याने गळफास लावून घेतला.

गिट्टीखदानमधीलच मकरधोकडा जगदीशनगरात राहणारे हेमराज शामराव वरठी (वय ५१) यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

अंबाझरीतील हिलटॉप सेवानगर येथे राहणारे मनोज विकूजी नागेश्वर (वय ४७) यांनी सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.

यशोधरानगरातील कांजी हाऊस चाैकाजवळ राहणारे योगेश गुलाबराव घुमे (वय ३५) यांनी सोमवारी रात्री गळफास लावून घेतला.

हुडकेश्वरमधील वैभवनगर, दिघोरी येथील रहिवासी चंद्रकांत उत्तम उमक (वय ४२) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

सोनेगावमधील न्यू स्वावलंबीनगरात राहणारे विजय जयलाल रहांगडाले (वय ३४) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. या सर्व प्रकरणात संबंधित पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

तरुणीने विष प्राशन केले

नागपूर : दीक्षा दीपक नारनवरे (वय २१, रा. सिरसपेठ) नामक तरुणीने विष पिऊन आत्महत्या केली. ५ जूनच्या दुपारी ४ वाजता तिने विष घेतले. ते लक्षात आल्यानंतर तिला घरच्यांनी मेडिकलमध्ये भरती केले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी सोमवारी सायंकाळी दीक्षाला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

अंबाझरी तलावात मृतदेह आढळला

नागपूर : अंबाझरी तलावात मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास ब्रिजेश भारत तिवारी (वय २८) या तरुणाचा मृतदेह आढळला. भारत मोतीलाल तिवारी (वय ५१) यांनी दिलेल्या माहितीवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---