शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दर दिवसाला डेंग्यूचे सात रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:11 IST

नागपूर : डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी घराघरांची विशेष सर्वेक्षण मोहीम सुरू होऊन एक महिना झाला आहे. परंतु त्यानंतरही दूषित घरांची ...

नागपूर : डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी घराघरांची विशेष सर्वेक्षण मोहीम सुरू होऊन एक महिना झाला आहे. परंतु त्यानंतरही दूषित घरांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. धक्कादायक म्हणजे, मागील १४ दिवसात ९३ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली. दर दिवसाला जवळपास सात रुग्ण आढळून येत आहेत. जानेवारी ते १४ ऑगस्ट यादरम्यान ४१८ रुग्णांची नोंद झाली असून, तीन रुग्णांचा जीव गेला आहे.

डेंग्यूच्या साथीने चांगलेच थैमान घातले आहे. डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. २०१२ पासून नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यू आढळून येत असतानाही शासनासोबत नागरिकही याला थांबविण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे वास्तव आहे. रुग्ण वाढल्यावरच उपाययोजना केल्या जात असल्याने, दरवर्षी रुग्णात वाढ होत आहे. विशेष म्हणजे, सर्वेक्षणात दूषित घरांवर कारवाई होत नाही. यामुळे सर्वेक्षणाला कुणी गंभीरतेने घेत नसल्याचेही चित्र आहे.

- जूनमध्ये ८६, जुलै महिन्यात २५१ रुग्ण

डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. जून महिन्यात डेंग्यूचे ८६, जुलै महिन्यात तब्बल २५१ तर मागील १४ दिवसात ९३ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. यामुळे लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन हिवताप व हत्तीरोग विभागाचा दीपाली नासरे यांनी केले आहे.

- ३७० घरे दूषित

प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षणात मंगळवारी ८,४४६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यापैकी ३७० घरे दूषित आढळली, म्हणजेच या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. मनपाच्या सर्वेक्षणात दूषित घरांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वेक्षणावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.