शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तडीपारीचा न्यायप्रविष्ट प्रकरणांशी संबंध नाही

By admin | Updated: March 1, 2017 02:19 IST

गुन्हेगाराविरुद्ध न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांचा तडीपारीशी काहीच संबंध नाही. गुन्हेगाराला तडीपार करताना तो समाजाकरिता किती घातक आहे

पूर्णपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय : परवानगीने प्रतिबंधित हद्दीत प्रवेश करता येतो नागपूर : गुन्हेगाराविरुद्ध न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांचा तडीपारीशी काहीच संबंध नाही. गुन्हेगाराला तडीपार करताना तो समाजाकरिता किती घातक आहे हे पाहिले जाते. त्याच्याविरुद्ध न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा विचार केला जात नाही. त्यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणे लक्षात न घेता व प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयात उपस्थित राहण्याची परवानगी न देता गुन्हेगाराला संबंधित हद्दीतून तडीपार केल्यास तो आदेश चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पूर्णपीठाने मंगळवारी दिला. पूर्णपीठामध्ये न्या. भूषण गवई, न्या. प्रसन्न वराळे व न्या. इंदिरा जैन यांचा समावेश होता.महाराष्ट्र पोलीस कायदा-१९५१ मध्ये गुन्हेगारांना तडीपार करण्याची तरतूद आहे. तसेच, तडीपार गुन्हेगाराला विविध कारणांनी प्रतिबंधित हद्दीत तात्पुरता प्रवेश करायचा असल्यास तो त्यासाठी कायद्यातील कलम ६३ अंतर्गत संबंधित प्राधिकाऱ्याकडे परवानगी मागू शकतो. त्यामुळे तडीपारीचा आदेश जारी करताना गुन्हेगाराला न्यायप्रविष्ट प्रकरणावरील सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा विचार करणे गरजेचे नाही असेही पूर्णपीठाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या द्विसदस्यीय न्यायपीठांनी ‘अक्रम अजिज शेख’ व ‘पंकज आत्राम’ या दोन प्रकरणांत भिन्न भूमिका घेतल्या होत्या. ‘अक्रम अजिज शेख’ प्रकरणामध्ये गुन्हेगाराला तडीपार करण्यापूर्वी प्रतिबंधित हद्दीतील त्यांच्याविरुद्धची न्यायप्रविष्ट प्रकरणे लक्षात घेणे व त्याला प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयात उपस्थित राहण्याची परवानगी देणे आवश्यक असल्याचे म्हटले गेले आहे. ‘पंकज आत्राम’ प्रकरणामध्ये ‘अक्रम अजिज शेख’ प्रकरणावरील निर्णयाचा संदर्भ देण्यात आला असता न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी यापेक्षा भिन्न भूमिका घेतली. परिणामी २६ आॅगस्ट २०१६ रोजी या न्यायपीठाने सदर मुद्यावर पूर्णपीठाकडून योग्य निर्णय होण्यासाठी हे प्रकरण मुख्य न्यायमूर्तींकडे पाठविले होते. पूर्णपीठाने गेल्या १४ फेब्रुवारी रोजी प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय मंगळवारी घोषित करण्यात आला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास, अ‍ॅड. आर. पी. जोशी, अ‍ॅड. अमित किनखेडे व अ‍ॅड. रजत माहेश्वरी तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता शिशिर उके यांनी युक्तिवाद केला.(प्रतिनिधी)