शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर काळ्याबाजाराचे खटले ३१ मेपर्यंत निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:07 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजाराचे आठ खटले मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात स्थानांतरित करून ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजाराचे आठ खटले मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात स्थानांतरित करून हे खटले ३१ मेपर्यंत निकाली काढण्याचा आदेश दिला़ तसेच, या खटल्यांमध्ये सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी फौजदारी वकिलीचा दीर्घ अनुभव असलेल्या अ‍ॅड. ज्योती वजानी यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली़

यासंदर्भातील जनहित याचिकेवर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली़ नागपूर पोलिसांनी आतापर्यंत रेमडेसिविर काळ्याबाजाराच्या १३ प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदविले आहेत़ त्यापैकी आठ प्रकरणांमधील आरोपींविरुद्ध ३ मे रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्रे दाखल करण्यात आली होती़ उच्च न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, हे खटले मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात चालवण्याचा आदेश दिला़ तसेच, पोलिसांना उर्वरित पाच प्रकरणाचा तपास एक आठवड्यात पूर्ण करण्यास सांगितले आणि या प्रकरणांचे खटलेदेखील मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयातच चालवले जावे, असे निर्देश दिले़ सुरुवातीला या खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयातील सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. तहसीन मिर्झा यांना विचारणा करण्यात आली होती़ मिर्झा यांनी कामाच्या व्यस्ततेमुळे या खटल्यांची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली़ परिणामी, न्यायालयाने अ‍ॅड. ज्योती वजानी यांना ही जबाबदारी दिली़ न्यायालयाने सदर विविध निर्देश दिल्यानंतर ही याचिका निकाली काढली़