शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अजनी वा खापरी येथे मल्टीमॉडेल हब उभारणार

By admin | Updated: March 27, 2017 02:18 IST

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत विकासाचे विविध प्रकल्प सुरू आहेत.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी : केंद्राकडून मिळणार ३०० कोटीनागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत विकासाचे विविध प्रकल्प सुरू आहेत. लवकरच अजनी किंवा खापरी येथे ‘मल्टीमॉडेल हब’ उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारक डून ३०० कोटींचा निधी मिळणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित पार्किंग शेडच्या लोकार्पणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या समोरील भागात ५० हजार चौरस फूट जागेत उभारण्यात आलेल्या पार्किंग शेडचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.‘मल्टीमॉडेल हब हा रेल्वे, रस्ते व हवाई वाहतुकीचा संयुक्त प्रकल्प राहणार आहे. या प्रस्तावावर विचार सुरू आहे. यात रेल्वे सहभागी झाल्यास अजनी येथील २५० हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाईल, अन्यथा खापरी येथील ३५० ते ४०० हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात येईल. यासाठी पाच कंपन्यांना दोन-तीन दिवसात हमी दिली जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, विधायक कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, आशिष देशमुख, सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विमानतळ संचालक रोशन कांबळे, मिहान इंडिया लि.चे सीएमडी विश्वास पाटील, अधीक्षक अभियंता एस.व्ही. चहांदे, वरिष्ठ संचालक विजय मुळेकर, महाव्यवस्थापक आबीद रुही, वरिष्ठ व्यवस्थापक सूरज शिंदे, सहायक व्यवस्थापक राहुल लेंबर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)मध्यवर्ती कारागृहाचे मौदा येथे स्थानांतर अजनी येथे मल्टीमॉडेल हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्यास यासाठी २५० हेक्टर जमिनीची गरज भासणार आहे. त्यामुळे अजनी येथील मध्यवर्ती कारागृह मौदा येथे स्थलांतरित करण्यात येईल. यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली. असे आहे पार्किंग शेडविमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या समोरील जागेत चार कोटींचा खर्च करून भव्य डोम उभारण्यात आला आहे, सोबतच एक पार्किंग शेड उभारण्यात आले आहे. यात प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग बनविण्यात आले आहेत. शेड उभारण्यासाठी इस्त्रायल येथून पॉलिकार्बोनेट शीट माविण्यात आली आहे. त्यामुळे अल्ट्राव्हायलेट किरणे फिल्टर होऊ न आत येतात. परिसरात तीन हॉटेल व आईस्क्र ीम पार्लर आहेत.