शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सत्र प्रणालीचा उपक्रमांना फटका?

By admin | Updated: September 23, 2016 03:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदापासून विज्ञानसोबतच कला आणि वाणिज्य पदवी अभ्यासक्रमांना सत्र प्रणाली लागू करण्यात आली आहे

नागपूर विद्यापीठ : एनएसएस, एनसीसीमध्ये यंदा अपेक्षित सहभाग नाहीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदापासून विज्ञानसोबतच कला आणि वाणिज्य पदवी अभ्यासक्रमांना सत्र प्रणाली लागू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा परीक्षा द्यायच्या आहेत. याचा फटका विद्यापीठाच्या सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना बसण्याची शक्यता आहे. अभ्यासाचा तणाव असल्यामुळे ‘एनएसएस‘, ‘एनसीसी’ तसेच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी व्हायचे की नाही असा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न आहे.मागील वर्षीपर्यंत पदवीस्तरावर बीएस्सीला सत्र प्रणाली होती. परंतु यंदापासून कला व वाणिज्य अभ्यासक्रमांनादेखील ही प्रणाली अनिवार्य आहे. नोव्हेंबरपासून या परीक्षा सुरू होणार आहेत. याच कालावधीत ‘एनएसएस’, ‘एनसीसी’, क्रीडा स्पर्धा ‘अश्वमेध’, सांस्कृतिक स्पर्धा ‘इंद्रधनुष्य’, तांत्रिक महोत्सव ‘अविष्कार’ तसेच आपत्कालीन व्यवस्थापनावर आधारित ‘आव्हान’चे आयोजन करण्यात येते. हे सर्व उपक्रम साधारणत: आॅक्टोबरपासून सुरू होतात व जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत चालतात. या उपक्रमांत सहभाग घेतला तर अभ्यासाला फटका बसू शकतो, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, विधी अभ्यासक्रमांचे विद्यार्थी हव्या त्या प्रमाणात या उपक्रमांत सहभागी होत नसल्याचे चित्र याअगोदर दिसून आले आहे. यंदापासून कला व वाणिज्य शाखेचे विद्यार्थीदेखील असेच पाऊल उचलतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी)परीक्षा लक्षात घेऊन उपक्रमांचे आयोजनसत्र प्रणालीमुळे विद्यापीठाच्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागी होण्याची संख्या कमी होऊ शकते हे अधिकाऱ्यांना माहीत आहे. नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीच विविध उपक्रमांत लक्षणीय कामगिरी केली आहे. परीक्षेमुळे त्यांचा हिरमोड होऊ नये यासाठी परीक्षा तारखा लक्षात घेऊन उपक्रमांचे आयोजन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती ‘एनएसएस’चे कार्यक्रम समन्वयक डॉ.भाऊ दायदार व विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.निहाल शेख यांनी सांगितले.