शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एनसीआय’मध्ये दिलेली सेवा असणार ‘बंधपत्रित’ : शासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:53 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या पदवी व पदव्युत्तर डॉक्टरांकडून ग्रामीण भागात किंवा शासकीय उपक्रमात एक वर्षाची वैद्यकीय सेवा देण्याचे ‘बंधपत्र’ लिहून घेतले जाते. आता नागपुरातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना सेवा देणाऱ्या ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ (एनसीआय) या खासगी संस्थेमध्ये दिलेली वैद्यकीय सेवाही ‘बंधपत्रित सेवा’ म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. गुरुवारी याला शासकीय मान्यता देण्यात आली.

ठळक मुद्देडॉक्टरांना मिळणार कॅन्सर रुग्ण सेवेची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या पदवी व पदव्युत्तर डॉक्टरांकडून ग्रामीण भागात किंवा शासकीय उपक्रमात एक वर्षाची वैद्यकीय सेवा देण्याचे ‘बंधपत्र’ लिहून घेतले जाते. आता नागपुरातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना सेवा देणाऱ्या ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ (एनसीआय) या खासगी संस्थेमध्ये दिलेली वैद्यकीय सेवाही ‘बंधपत्रित सेवा’ म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. गुरुवारी याला शासकीय मान्यता देण्यात आली.याचा फायदा रुग्णसेवेसोबतच संबंधित डॉक्टरांनाही होणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. खर्चाच्या तुलनेत विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेले शुल्क अत्यल्प असते. याची काहीअंशी परतफेड म्हणून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शासकीय सेवा करण्याबाबतचे बंधपत्र (बॉण्ड) लिहून घेतला जातो. राज्यातील ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने ती भरून काढण्यासाठी व त्यांना वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी एक वर्षाची ‘बंधपत्रित सेवा’ यातून दिली जाते. ही सेवा केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, संरक्षण दलाचे उपक्रम किंवा नक्षलग्रस्त, दुर्गम व आदिवासीबहुल भागामध्ये कार्यरत अशासकीय संस्थेमध्ये दिली जाते. आता हीच ‘बंधपत्रित’सेवा नागपूरच्या जामठा येथील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे दिल्यास ती ग्राह्य मानली जाणार आहे. यामुळे कॅन्सरग्रस्तांना रुग्णसेवा पुरविण्याचे कार्य करणाऱ्या खासगी संस्थांना प्रोत्साहन मिळणार आहे. सोबतच कॅन्सरग्रस्तांना लवकरात लवकर रुग्णसेवा मिळण्याची शक्यता आहे.उमेदवारांची बंधपत्रित सेवा घेताना काही अटीही लावण्यात आल्या आहेत. यात उमेदवारांच्या निवासाची व्यवस्था संबंधित संस्थेने करावयाची आहे. बंधपत्रित उमेदवाराचे मानधन हे संस्थेला शासनाचा नियमानुसार द्यावे लागेल. यासाठी संबंधित संस्थेने शासकीय यंत्रणेकडून आवश्यक त्या मान्यता घेणे आवश्यक असणार आहे. बंधपत्रित उमेदवार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालये, आरोग्य केंद्र व वैद्यकीय शिक्षण विभागाची असणार आहे. केवळ रुग्ण सेवेशी संबंधित काम करून घेणे बंधनकारक असणार आहे. बंधपत्रित उमेदवाराला शासन नियमानुसार रजा व सुट्या द्याव्या लागणार आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरGovernmentसरकार