शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शोषितांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा

By admin | Updated: November 30, 2014 00:55 IST

स्वामी विवेकानंद व पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची केलेली सेवा, हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.

नितीन गडकरी : अपंगांना साहित्य वाटपनागपूर : स्वामी विवेकानंद व पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची केलेली सेवा, हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. महापालिकेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत आयोजित ० ते १८ वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना साहित्य व साधने वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. व्यासपीठावर आमदार विकास कुंभारे , सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आयुक्त श्याम वर्धने, अप्पर आयुक्त हेमंतकुमार पवार, शिक्षण समितीच्या सभापती चेतना टांक, शिवसेनेच्या गटनेत्या शीतल घरत, सभापती गिरीश देशमुख, सविता सांगोळे व अश्विनी जिचकार, सामाजिक कार्यकर्ते अभिजित राऊत आदी उपस्थित होते.विवेकानंद व उपाध्याय यांचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून महापालिका व पंडित दीनदयाल इन्स्टिट्यूट साहित्य वाटप करीत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. देहदानाप्रमाणे दृष्टिदानाची चळवळ उभी राहिली पाहिजे. त्या दृष्टीने माधव नेत्रपेढी चांगले काम करीत आहे. गरीब लोकांना डायलिसिसची सोय कमी खर्चात उपलब्ध केलेली आहे. यासाठी आणखी दोन केंद्र सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मिलिंद माने यांनी नागपुरातील सहकारी हॉस्पिटलचा अभ्यास करावा. तसेच पूर्व विदर्भातील सिकलसेलचा आजार विचारात घेता त्यावर उपाययोजना कराव्या. यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही गडकरी यांनी माने यांना दिली. अपंगांना कृत्रिम अवयव पुरविण्यासाठी पुढाकार घेतल्याबाबत वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेड याचे त्यांनी अभिनंदन केले. विविध सेवा, सुविधांची माहिती प्रवीण दटके यांनी यावेळी दिली. श्याम वर्धने यांनी गरजू विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी २२४ अपंग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. वेकोलिचे महाप्रबंधक सुरेश राव, पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अ‍ॅन्ड ह्युमन सिसोर्सेसचे संचालक डॉ. विरल कामदार, महाजन फिल्म अ‍ॅकेडमीचे संचालक विजयकुमार सूद, डॉ. खापर्डे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे , स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी, नगरसेवक संजय बोंडे, प्राचार्य योगानंद काळे उपस्थित होते. संचालन दिनेश मासोदकर यांनी तर आभार लोखंडे यांनी मानले.(प्रतिनिधी)