शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नोकराची आत्महत्या : नागपुरातील मधूर वाईन शॉपच्या मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 21:03 IST

कामाचे पैसे मागणाऱ्या नोकराला मधूर वाईन शॉपचा मालक आणि त्याचे दोन कर्मचारी यांनी कटकारस्थान करून खोट्या गुन्ह्यात गोवले. त्यामुळे व्यथित झालेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. कळमना पोलिसांनी वाईन शॉपचा मालक आणि त्याचे दोन कर्मचारी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देखोट्या गुन्ह्यात गोवले : आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामाचे पैसे मागणाऱ्या नोकराला मधूर वाईन शॉपचा मालक आणि त्याचे दोन कर्मचारी यांनी कटकारस्थान करून खोट्या गुन्ह्यात गोवले. त्यामुळे व्यथित झालेल्या अतुल प्रभाकर ठवरे (वय २९) नामक तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूला वाईन शॉपचा मालक आणि त्याचे दोन कर्मचारी कारणीभूत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाल्यामुळे कळमना पोलिसांनी या तिघांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल केला.कळमन्याच्या नेताजीनगरात राहणाऱ्या अतुलने २० ऑ गस्ट २०१९ ला दुपारी गळफास लावून आत्महत्या केली होती. अतुल सीताबर्डीतील मधूर वाईन शॉपमध्ये नोकर होता. त्याच्या भावाचे लग्न असल्यामुळे अतुलने ९ मे २०१९ ला चार दिवसांची सुटी घेतली होती. लग्न आटोपल्यानंतर तो कामावर परत गेला असता, तेथील व्यवस्थापक शेखर सोनकुसरे याने तुला कामावरून काढून टाकल्याचे सांगितले. त्यामुळे अतुल दडपणात आला. त्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी चहाची टपरी लावली. मात्र, ती चालत नव्हती. आपल्या कामाचे थकीत पैसे मिळावे म्हणून वाईन शॉपचा मालक आरोपी विशाल जयस्वाल याच्याकडे चकरा मारत होता. मात्र, आरोपी जयस्वाल तसेच व्यवस्थापक शेखर सोनकुसरे आणि शेखर बोरकर अतुलला शिवीगाळ करून त्रास देत होते. प्रचंड मानसिक दडपणात असलेल्या अतुलने ३१ मे रोजी वृत्तपत्रात एक बातमी वाचली. त्यात त्याने (अतुलने) वाईन शॉपचा मालक आणि व्यवस्थापकाला ५० लाखांची खंडणी मागितल्यामुळे बोरकरच्या तक्रारीवरून अतुलवर वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे नमूद होते. या बातमीमुळे अतुल प्रचंड दडपणात आला. कटकारस्थान करून वाईन शॉपचा मालक आणि दोन्ही व्यवस्थापकांनी आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला. आता आपल्याला पोलीस अटक करतील, आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले, असे म्हणून अतुल सारखा रडत होता. या अवस्थेत त्याने २० ऑगस्टला गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, मृत्युपूर्वी अतुलने सुसाईड नोट लिहून ठेवली आणि आरोपी विशाल जयस्वाल, शेखर बोरकर तसेच शेखर सोनकुसरेचे कुकृत्य लिहून ठेवले.त्यामुळे अतुलची पत्नी मनीषा (वय २७) हिची तक्रार नोंदवून घेत कळमना पोलिसांनी रविवारी आरोपी विशाल जयस्वाल, शेखर बोरकर आणि शेखर सोनकुसरे या तिघांविरुद्ध अतुलच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.दोघांना अटक, मुख्य आरोपी फरारपोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विशाल जयस्वाल तसेच बोरकर आणि सोनकुसरेने अतुल ठवरेविरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात ५० लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा एका एसएमएसच्या आधारे दाखल केला. विशेष म्हणजे, वाडी पोलिसांनीही हा गुन्हा दाखल करताना तत्परता दाखवली. पोलिसांनीच लावलेल्या अंदाजाप्रमाणे कामाचे पैसे मागण्यासाठी अतुलने हा मेसेज केला असावा, त्यात पाच हजारांच्या पुढे अनावधानाने शून्याची बटन अनेकवेळा दबली असावी. अतुल भितऱ्या (भेकड) स्वभावाचा होता. तो एवढी मोठी खंडणी कशी काय मागेल, याचाही विचार करण्यात आला नाही अन् एका तरुणाचा नाहक बळी घेतला गेला. त्यामुळे त्याचा परिवार उघड्यावर आला आहे. कळमना पोलिसांनी या प्रकरणी बोरकर आणि सोनकुसरेंना अटक केली. जयस्वाल फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या