शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा गंभीर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:49 IST

येष्ठ नागरिकांची सुरक्षा अतिशय गंभीर प्रश्न आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी व्यक्त करून....

हायकोर्टाचे मत : आरोपीवर दया दाखविण्यास नकार दिलालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा अतिशय गंभीर प्रश्न आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी व्यक्त करून वृद्ध महिलेच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर दया दाखविण्यास स्पष्ट नकार दिला.ज्येष्ठ नागरिक असहाय असतात. त्याचा फायदा घेण्याची प्रवृत्ती गुन्हेगारांमध्ये वाढली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची हत्या करून मुद्देमाल लंपास करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुलेमुली नोकरी व शिक्षणानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर घरामध्ये त्यांचे वृद्ध आई-वडीलच राहात असतात. अशा घरांमध्ये चोऱ्या करणे गुन्हेगारांना सोईचे वाटते. ज्येष्ठ नागरिक त्यांच्याशी दोन-दोन हात करू शकत नाही. एखाद्याने विरोध केल्यास गुन्हेगार त्यांना ठार मारण्यास मागे-पुढे पाहात नाहीत. निर्जन ठिकाणीदेखील ज्येष्ठ नागरिकांना लुटले जाते. अशा प्रवृत्तीवर वचक निर्माण करण्यासाठी न्यायालयाने दिलेला निर्णय उपयोगी सिद्ध होणारा आहे.न्यायालयाचा दणका बसलेल्या आरोपीचे नाव योगेश कचरू इघे (३५) असून तो कुंभार टोली येथील रहिवासी आहे. त्याने रामदासपेठेतील डॉ. रेखा राजन भिवापूरकर (७०) यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. पतीच्या मृत्यूनंतर त्या घरात एकट्याच राहात होत्या. त्यांचे चिरंजीव आशिष नोकरीसाठी मुंबईत होते तर, कन्या शिल्पा सिव्हिल लाईन्स येथील सासरच्या घरी होत्या. ११ सप्टेंबर २०१३ रोजी मध्यरात्रीनंतर आरोपीने भिवापूरकर यांच्या घरात प्रवेश केला. दरम्यान, तो मुद्देमाल शोधण्यासाठी भिवापूरकर यांच्या शयनकक्षात गेला. त्याचवेळी भिवापूरकर यांना जाग आली असता त्यांना आरोपी उभा दिसला. त्यांनी चौकीदाराला बोलावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना गप्प करण्यासाठी गळा दाबून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. भिवापूरकर यांनी बोटाचा चावा घेतल्यामुळे आरोपीची पकड सैल झाली. भिवापूरकर यांनी त्याला लाथ मारून दूर पाडले. आरोपी पहिल्या माळ्यावर लपून बसला होता. नागरिक शोधाशोध करीत पहिल्या माळ्यावर पोहोचले असता आरोपी बाहेर पळाला. आरोपीची शिक्षा कायम२७ जुलै २०१५ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०७ अंतर्गत पाच वर्षे तर, कलम ३९२ अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. तसेच, दया दाखविण्याची विनंती न्यायालयाला केली होती. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी आरोपीची ही विनंती व अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश नायक यांनी बाजू मांडली.