शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलीस आयुक्तांकडून बुकीबाजाराची गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:31 IST

bookie Nagpur News पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या निदेर्शानुसार, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या कार्यालयात सोमवारी रात्री ८ ते १० बड्या बुकींना पकडून आणण्यात आले.

ठळक मुद्देमध्यरात्रीपर्यंत अनेकांची झाडाझडती?बड्या बुकींची पेशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील अनेक बड्या बुकींना पकडून आणल्यानंतर त्यांची मध्यरात्रीपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतल्याचे वृत्त पसरल्याने शहरात एकच खळबळ उडाली. अमरावती पोलिसांनी नागपुरात येऊन बुकींना पकडल्यामुळे शहरातील बुकींबाबत पोलीस हात बांधून बसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलीस आयुक्त यांनी त्याची गंभीर दखल घेत ही कारवाई केल्याचे समजते. तथापि, मध्यरात्रीपर्यंत या माहितीला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळाला नाही.

अमरावती पोलिसांनी खोलापुरी गेट भागात कारवाई करून यवतमाळ तसेच नागपुरातील बुकींना जेरबंद केले. या बुकींना नागपुरातून संचलित केले जात असल्याचे कळताच अमरावतीचे पोलीस नागपुरात पोहचले आणि त्यांनी जरीपटक्यातील सुमित शंकर नागवाणी (रा. पिरामिड सिटी, फ्लॅट क्रमांक २०४, जरीपटका) आणि रॉकी रमेशलाल अलवाणी (रा. जरीपटका) या दोघांना अटक करून अमरावतीत नेले. अमरावती पोलिसांनी नागपुरात येऊन कारवाई केल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या निदेर्शानुसार, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या कार्यालयात सोमवारी रात्री ८ ते १० बड्या बुकींना पकडून आणण्यात आले. येथे त्यांची झाडाझडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.वरिष्ठांचा नो रिस्पॉन्स !या संबंधाने अतिरिक्त आयुक्त रेड्डी यांच्याकडे वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बुकींची नावे अथवा संबंधित सविस्तर माहिती मिळू शकली नाही. संबंधित वृत्तालाही दुजोरा मिळू शकला नाही.

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी