शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दंत-नेत्र तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था

By admin | Updated: May 25, 2016 02:57 IST

भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळाच्यावतीने आयोजित आरोग्य महाशिबिरात दररोज नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.

भाजपा आरोग्य महाशिबिर : २७ मेच्या टोकन वितरणाला सुरुवातनागपूर : भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळाच्यावतीने आयोजित आरोग्य महाशिबिरात दररोज नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शिबिरात दंत तपासणी व नेत्र रुग्णांची संख्या अधिक असल्याने, यासाठी स्वतंत्र नोंदणी व तपासणीची व्यवस्था मंगळवारपासून करण्यात आली आहे. मंगळवारी आरोग्य महाशिबिराला खा. अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, सहकार आघाडीचे अध्यक्ष संजय भेंडे, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, भोजराज दुबे, किशोर पलांदूरकर यांनी हजेरी लावली. तसेच या ठिकाणी असलेल्या योग्य नियोजन आणि व्यवस्थेमुळे संयोजक संदीप जोशी व सहसंयोजक प्रकाश भोयर यांचे कौतुक केले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या २७ मे रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २१ मेपासून शिबिराला सुरुवात झाली आहे. बी.आर. मुंडले सभागृह, दीक्षाभूमीजवळ नागरिकांना २६ मेपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शिबिराचा लाभ घेता येईल. तसेच याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी काऊंटर सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान सुरू ठेवण्यात आले आहे. शिबिरात नेत्ररोग तपासणी, अस्थिव्यंग्योपचार, सामान्य सर्जरी, मेंदूरोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कान-नाक-घसा तपासणी व शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, जनरल मेडिसीन, दंतरोग, पॅथालॉजीसह सर्व आजारांची तपासणी, उपचार करण्यात येत आहेत. नागरिकांनी टोकन घेण्यासाठी सकाळी ८.३० पासूनच शिबिरस्थळी येण्यास सुरुवात केली होती. मात्र कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे कुणाचीही गैरसोय झाली नाही. शिबिरस्थळी तपासणीसोबतच औषध पूर्णपणे नि:शुल्क मिळत असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पहिल्या हजार रुग्णांची नोंदणी सुमारे ११ वाजताच पूर्ण झाली होती. तरी नागरिकांची काळजीकरिता आयोजकांनी २७ मे रोजीच्या शिबिराच्या टोकन वाटपास सुरुवात करण्यात आली. (प्रतिनिधी)