नागपूर : महापालिकेने राबविलेल्या आणखी एका उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. महापालिका दरमहा ऊर्जा बचतीसाठी पौर्णिमेच्या रात्री तासभर पथदिवे बंद ठेवून ऊर्जा बचतीचा संकल्प घेण्याचा उपक्रम राबविते. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनाच्या भाषणात या उपक्रमाचा उल्लेख करीत कौतुक केले. एवढेच नव्हे तर हा उपक्रम देशभर राबविण्यात यावा, असे आवाहानही केले. यामुळे नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.असा आहे नागपूर पॅटर्न महापौर अनिल सोले हे प्रत्येक पौर्णिमेच्या चार दिवसांपूर्वीपासून नागरिकांना पौर्णिमेच्या दिवशी रात्री ८ ते ९ पर्यंत एक तास घरातील, प्रतिष्ठानातील, रस्त्यावरील दिवे बंद करण्याचे आवाहन करायचे. प्रत्येक पौर्णिमेला शहरातील एका चौकात कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जमायचे. त्या परिसरातील पथदिवे तासभर बंद केले जायचे. या वेळी ऊर्जा बचतीची व निसर्ग संवर्धनाचा संकल्प केला जायचा. नागरिकही दुकानांतील, घरातील दिवे बंद करायचे. एवढेच नव्हे तर ३२ हजार ७५१ नागरिकांनी ऊर्जा बचतीचे संकल्पपत्रही भरून दिले आहे. हा क्रम दरमहा नित्यनिमाने सुरू आहे.
नफेखोरीने सेन्सेक्स 59 अंकांनी घसरला
By admin | Updated: September 6, 2014 03:00 IST