शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ

By admin | Updated: October 2, 2015 07:30 IST

नागपूर रेल्वेस्थानकाच्या सेकंड क्लास वेटिंग रुममध्ये दुपारी ३.१० वाजता एका बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या सेकंड क्लास वेटिंग रुममध्ये दुपारी ३.१० वाजता एका बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान लोहमार्ग पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाने तपासणी करून बॅगमध्ये कुठलीच संशयास्पद वस्तू नसल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात प्लॅटफार्म क्रमांक १ वर आरपीएफच्या बॅग स्कॅनर शेजारी सेकंड क्लास वेटिंग रुम आहे. दुपारी ३ वाजता बऱ्याच वेळापासून या वेटिंग रुममध्ये एक बेवारस सुटकेस ठेवलेली आढळली. या सुटकेसबाबत काही प्रवाशांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात सूचना दिली. उपस्टेशन व्यवस्थापकांनी लोहमार्ग पोलिसांना पाचारण केले. लोहमार्ग पोलिसांचे बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व प्रवाशांना तेथून बाहेर काढले. एक्स रे मशीन, रीना नावाचा श्वान आणि इतर उपकरणांसह तपासणी सुरू केली. थोड्या वेळानंतर त्यांनी या सुटकेसमध्ये कुठलीच संशयास्पद वस्तू नसल्याचे जाहीर केले. ही सुटकेस छिंदवाडा येथील समीर पाल नावाच्या पत्रकाराची असल्याचे त्यात आढळलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. ही कारवाई लोहमार्ग पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाचे उपनिरीक्षक धर्मदीप इंगळे, मनोज गुप्ता, देवेंद्र जुमनाके, सुनील शुक्ला, अरुण साळवे, गौरव भोयर, प्रशांत इंगोले, अविनाश नारनवरे, जयंत नांदेडकर यांनी पार पाडली. आॅक्टोबर महिन्यात विजयादशमीनिमित्त प्रवाशांची संख्या रेल्वेस्थानकावर वाढणार आहे. त्यामुळे ‘बीडीडीएस’ पथकाने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)