शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

सायंकाळ होताच वरिष्ठ डॉक्टर होतात गायब  : मेयोतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:42 IST

सायंकाळ होताच वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयातून गायब होत असल्याने, त्यांचा वचक राहत नसल्याने असे प्रकार रोजच घडत असल्याच्या तक्रारी आहेत.

ठळक मुद्देगरीब रुग्णांना बसतोय फटका

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नगरसेवकाच्या मुलाला उपचार न मिळाल्याच्या घटनेने मेयोत खळबळ उडाली. दोषी ठरलेल्या तीन ‘कॅज्युल्टी मेडिकल ऑफिसर’ची (सीएमओ) सेवा समाप्त करण्यात आली, तर चार निवासी डॉक्टर, तीन नर्सेस व एका ब्रदरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यानंतरही रुग्णालयाचा कारभार सुधारण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. सायंकाळ होताच वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयातून गायब होत असल्याने, त्यांचा वचक राहत नसल्याने असे प्रकार रोजच घडत असल्याच्या तक्रारी आहेत.गरीब, मध्यमवर्गीयांच्या घरात कुणी आजारी पडून त्याला रु ग्णालयात दाखल करायची वेळ आली तर मोठे संकट कोसळल्याप्रमाणे स्थिती होते. सरकारी रुग्णालयात नेल्यास रुग्ण जीवानिशी जाण्याची भीती असल्याने अनेक जण पदरमोड करून खासगी इस्पितळात जातात. परंतु येथे आपली लूट होत आहे, हे समजाच पुन्हा शासकीय रुग्णालयाकडे वळतात. परिणामी, मागील तीन वर्षांत मेयोमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या दोन हजारावरून तीन हजारावर गेली आहे, तर आंतररुग्ण विभागातही रुग्णांची संख्या वाढल्याने बहुसंख्य वॉर्डांच्या खाटा फुल्ल राहत आहेत. मात्र, नियोजन नसल्याने रुग्णसेवा ढासळत चालली आहे. गेल्याच आठवड्यात एका वरिष्ठ नगरसेवकाला अशा प्रसंगातून जावे लागले. या घटनेला गंभीरतेने घेत प्रशासनाने प्रथमच दोषींवर कारवाई केली. परंतु परिस्थीती आजही सुधारलेली नाही. यामागील कारण म्हणजे वरिष्ठ डॉक्टरांचा वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहे. रुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र विभाग (मेडिसीन), शल्यचिकित्सा विभाग (सर्जरी), बालरोग विभाग व अस्थिव्यंगोपचार विभागाशी संबंधित रुग्णांची संख्या मोठी असताना, सायंकाळी ६ नंतर सहायक प्राध्यापकांपासून ते इतरही वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयात राहत नाही. विशेष म्हणजे, दर दिवशी ठरलेल्या ‘युनिट’नुसार वरिष्ठ डॉक्टरांची ड्युटी लावली जाते. यामुळे रात्रीच्या वेळी रुग्णालयात त्यांनी हजर असणे आवश्यक आहे. परंतु ते ‘ऑनकॉल’ म्हणजे केवळ फोनवरच उपलब्ध असतात. वरिष्ठच आपली जबाबदारी सांभाळत नसल्याने कनिष्ठ डॉक्टरांचा मनमानीपणाचा फटका गरीब रुग्णांना सहन करावा लागत आहे. काही निवासी डॉक्टर तर स्वत:ला वरिष्ठ समजून सेवा देतात. त्यांच्याकडे अनुभव व कौशल्य कमी असल्याने, अनेकदा उपचाराला घेऊन त्यांचे आणि रुग्णांच्यानातेवाईकांचे खटके उडतात. हा प्रकार कधी थांबणार, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)doctorडॉक्टर