शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
5
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
6
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
7
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
8
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
9
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
10
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
11
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
12
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
13
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
14
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
16
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
17
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
18
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
19
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
20
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'

'तो' सुद्धा बलात्कारच ठरतो! हायकोर्टाचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 7:16 PM

High Court,Verdict, Rape case बलात्कार सिद्ध होण्यासाठी पीडित मुलीच्या शरीरावर आरोपीचे रक्त किंवा वीर्य आढळून येणे आवश्यक नाही, असे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले.

ठळक मुद्देहाथरस असंतोष काळात महत्त्वपूर्ण निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बलात्कार सिद्ध होण्यासाठी पीडित मुलीच्या शरीरावर आरोपीचे रक्त किंवा वीर्य आढळून येणे आवश्यक नाही, असे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातही सदर मुद्दा उपस्थित झाला होता. या परिस्थितीत हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला.संबंधित आरोपीच्या वकिलाने पीडित मुलीच्या शरीरावर आरोपीचे रक्त किंवा वीर्य आढळून आले नसल्यामुळे बलात्कार सिद्ध होत नाही असा बचावाचा मुद्दा मांडला होता. उच्च न्यायालयाने हा मुद्दा खोडून काढत कायद्यामध्ये असे कुठेच नमूद केले नसल्याचे सांगितले. तसेच, आरोपीने केवळ संभोगाची सुरुवात करणेही कायद्यानुसार बलात्कार ठरतो, असे स्पष्ट केले. दिनकर त्र्यंबक बुटे (७३) असे आरोपीचे नाव असून तो खामगाव, जि. बुलडाणा येथील रहिवासी आहे. त्याने २० वर्षीय मनोरुग्ण व मूकबधिर मुलीवर बलात्कार केला आहे. उच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे त्याची १० वर्षे सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली. २५ जून २०१९ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला ही शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील फेटाळण्यात आले. वैद्यकीय तपासणीत पीडित मुलीसोबत लैंगिक संभोग झाल्याचे आढळून आले. यासह इतर पुरावे लक्षात घेता आरोपीला दणका देण्यात आला. ही घटना २८ मार्च २०१६ रोजी घडली होती.मनोरुग्ण मुलीच्या सहमतीला महत्त्व नाहीपीडित मुलीची शरीरसंबंधास सहमती होती असेही आरोपीचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने हा बचावही अमान्य केला. मुलगी १०० टक्के मनोरुग्ण आहे. अशा मुली शरीरसंबंध कशाला म्हणतात व या कृतीचे परिणाम काय होतात, हे समजण्यास असक्षम असतात. त्यामुळे त्यांच्या सहमतीला कायद्यात काहीच महत्त्व नाही. तसेच, अशा मुलींकडून आरोपीला विरोध करण्याची अपेक्षादेखील करता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कार