शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खतांची विक्री ई-पॉस मशीनने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 11:10 IST

जर कृषी सेवा केंद्राकडून आदेशाचे उल्लंघन करीत खतांची विक्री केली, तर अशा केंद्राचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिला आहे.

ठळक मुद्देअन्यथा कृषी सेवा केंद्राचे परवाने होणार रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील कृषी केंद्राकडून खताची विक्री ही ई-पॉस मशीनद्वारे होणे बंधनकारक आहे. जर कृषी सेवा केंद्राकडून आदेशाचे उल्लंघन करीत खतांची विक्री केली, तर अशा केंद्राचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिला आहे.रासायनिक खताच्या साठेबाजीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ई-पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आलेला आहे. पॉस मशीनद्वारे शासनाचे अनुदान थेट कंपनीला मिळणार असून खरेदीच्या नोंदी आधार कार्डशी संलग्न होणार आहेत. परिणामी रासायनिक खतांचा होणारा गैरव्यवहार बंद होईल, अशी अपेक्षा आहे. शिवाय या प्रणालीमुळे अनुदानित खतांचा वापर औद्योगिक क्षेत्रासाठी करण्यावरही मर्यादा येईल. सोबतच दुसऱ्या व्यक्तीच्या नावे पावती करून परस्पर खतांची विक्री करण्यावरही नियंत्रण येणार आहे. तसेच उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून आकडेवारी लक्षात यावी, यासाठी ई-पॉस मशीनद्वारे खतांची विक्री करणे गरजेचे आहे, तसा शासन निर्णयही आहे.जिल्ह्यात एकूण ९३० वर नोंदणीकृत कृषी सेवा केंद्र आहेत. सर्व केंद्रांना ई-पॉस मशीन वितरण करण्यात आल्या आहे. पॉस मशीनद्वारेच खतांची विक्री करणे गरजेचे असल्याच्या सूचना कृषी आयुक्त व कृषी संचालकांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कृषी केंद्रातून खतांची विक्री ई-पॉस मशीनद्वारे न झाल्यास केंद्रांचा परवाना रद्द करण्यात येणार असा इशारा देशमुख यांनी सर्व केंद्र चालकांना दिला आहे.

टॅग्स :agricultureशेती