शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

सेल्फीच्या नादात जीव गेला

By admin | Updated: November 16, 2016 02:33 IST

स्थानिक गडमंदिर परिसरात राम झरोक्यातून सेल्फी काढत असताना तरुणाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला

तरुणाचा मृत्यू : रामटेकच्या गडमंदिर परिसरातील घटनारामटेक : स्थानिक गडमंदिर परिसरात राम झरोक्यातून सेल्फी काढत असताना तरुणाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. गडमंदिरावरील त्रिपूर पौर्णिमा उत्सवादरम्यान अपघाती मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती जाणकार नागरिकांनी दिली. मनोज कल्याणराव भुते (२५, रा. भगवाननगर, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. रामटेक येथे रविवारपासून (दि. १३) त्रिपूर पौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवादरम्यान सोमवारी (दि. १४) मध्यरात्री १२ वाजता गडमंदिरावर त्रिपूर जाळण्यात आला. मनोज या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी रामटेकला आला होता. त्रिपूर जाळण्यात आल्यानंतर तो रात्री गडमंदिर परिसरातील राम झरोक्यातून सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो १५ फूट उंचीवरून खाली कोसळला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने लगेच रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.(शहर प्रतिनिधी)