शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

हवाई सफरीसाठी सेंट पॉल स्कूल नागपूरच्या सहिद रबडेची निवड

By admin | Updated: June 24, 2015 03:12 IST

लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेत सहभागी झालेल्या नागपूर येथील सेंट पॉल स्कूलचा विद्यार्थी सहिद नंदू रबडे याची....

२५ जूनला दिल्लीला जाणार : सहिदवर अभिनंदनाचा वर्षावनागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेत सहभागी झालेल्या नागपूर येथील सेंट पॉल स्कूलचा विद्यार्थी सहिद नंदू रबडे याची नागपूर-दिल्ली-नागपूर हवाई सफरीसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत सहिद नागपुरातून भाग्यवान विजेता ठरला आहे. लोकमत दैनिकातर्फे सहिदला विमानाने दिल्लीला जाण्याची संधी मिळाल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्काराचे मोती स्पर्धेत सहिदची निवड झाल्याने सेंट पॉल स्कूलचे संचालक डॉ. राजाभाऊ टांकसाळे, अध्यक्षा मंदाताई टांकसाळे, प्राचार्य देवांगना पुंडे, मुख्याध्यापिका संगीता पिरके, सुपरवायझर किरणबाला विल्फ्रेड, संपूर्ण शिक्षक, शिक्षिका व वर्गमित्रांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लोकमत वृत्तपत्र समूह सातत्याने प्रयत्न करीत आहे. दरवर्षी संस्काराचे मोती ही ज्ञानवर्धक स्पर्धा आयोजित केली जाते. २०१४-१५ मध्ये १ जुलै ते ११ आॅक्टोबर या १०० दिवसांच्या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेत विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यातून एका भाग्यवान विजेत्याची हवाई सफरसाठी निवड करण्यात आली आहे. नागपुरातून सेंट पॉल स्कूलचा सहिद रबडे याची निवड झाली आहे. सहिद येत्या २५ जूनला नागपुरातून दिल्लीकडे रवाना होणार आहे. विदर्भातून भाग्यवान ठरलेले सर्व विद्यार्थी राष्ट्रपती भवनाला भेट देणार आहे. लोकमतच्या या उपक्रमाबद्दल सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टांकसाळे यांनी अभिनंदन केले. (प्रतिनिधी)