कैलास जोगानी : सीए संस्थेतर्फे चर्चासत्रनागपूर : करप्रणालीतील संभ्रम आणि विविध मुद्यांवर योग्य मार्गदर्शन तसेच रिअल इस्टेटच्या निर्णायक व्यवहार प्रक्रियेत सीएंची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याची माहिती वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट कैलास जोगानी यांनी येथे दिली.अखिल भारतीय सीए संस्थेच्या नागपूर शाखेतर्फे रिअल इस्टेटवर चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी नागपूर सीए संस्थेच्या अध्यक्षा कीर्ती अग्रवाल उपस्थित होत्या.जोगानी म्हणाले, न्यायालयीन वाद हा रिअल इस्टेट व्यवहाराचा एक भाग आहे. त्यात कागदोपत्री व्यवहार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे रिअल इस्टेटच्या कोणत्याही व्यवहारात पडताना योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते.प्रास्ताविकेत कीर्ती अग्रवाल म्हणाल्या, कर आणि लेखासंबंधित विविध मुद्यांसह काही निर्णय घेण्यापूर्वी ग्राहकाने नेहमीच चार्टर्ड अकाऊंटंटचा सल्ला घ्यावा. रिअल इस्टेटची खरेदी आणि गुंतवणूक करतानाही सल्लामसलत करणे तेवढे महत्त्वाचे ठरते. तसेच ग्राहकांना काय हवे काय नाही, याची माहिती सीए रिअल इस्टेट क्षेत्रातील लोकांना देऊ शकतो. तांत्रिक सत्रात मुंबई येथील सीए विनय सिंग यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. मुंबईच्या लक्ष्मी विनय सिंग यांनी मुद्रांक, मूल्यांकन, प्रक्रिया, सहकारी संस्था, महाराष्ट्र अपार्टमेंट ओनर कायद्यांतर्गत सहाधिकार आदींवर माहिती दिली. दोन्ही वक्त्यांनी विषयवार प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमाचे संचालन कीर्ती कल्याणी यांनी केले तर सचिव संदीप जोतवानी यांनी आभार मानले. स्वप्नील घाटे आणि जितेन सांगलानी यांनी तांत्रिक सत्राचे संचालन केले. यावेळी सीए आर.के. गणेरीवाला, अनिल केडिया, मंजूषा गुढे, सुरेश लालवानी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रिअल इस्टेटमध्ये सीएंची भूमिका महत्त्वपूर्ण
By admin | Updated: November 27, 2015 03:18 IST