शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

मुलाचे कपडे पाहून पित्याला झाले अश्रू अनावर

By admin | Updated: January 9, 2015 00:48 IST

बहुचर्चित युग चांडक अपहरण व खून खटल्याच्या सुनावणीस प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात गुरुवारपासून प्रांरभ झाला.

युग चांडक हत्याकांड खटल्यास प्रारंभनागपूर : बहुचर्चित युग चांडक अपहरण व खून खटल्याच्या सुनावणीस प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात गुरुवारपासून प्रांरभ झाला. सुनावणी दरम्यान आपल्या चिमुकल्याचा फिक्कट निळ्या रंगाचा टी शर्ट आणि डाव्या कानातील सोन्याची बाळी पाहून डॉ. मुकेश चांडक यांना अश्रू अनावर झाले. मुकेश चांडक हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत. आपली साक्ष देताना त्यांनी राजेश धनालाल दवारे आणि त्याचा मित्र अरविंद अभिलाष सिंग या दोघांना न्यायालयात ओळखले. सरतपासणी साक्ष देताना चांडक यांनी सांगितले की, १ सप्टेंबर २०१४ रोजी ही घटना घडली होती. त्या दिवशी मी सकाळी ११ वाजता माझ्या क्लिनिकला निघून गेलो होतो. दोन्ही मुले धृव आणि युग शाळेत गेली होती. धृव हा शाळेच्या बसने तर युग कारने गेला होता. त्या दिवशी माझी पत्नीही सकाळी ११ वाजेपासून क्लिनिकमध्येच होती. माझ्या ड्रायव्हरचे नाव राजू तोटे आहे. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मला माझी पत्नी प्रेमळ हिने सांगितले की, क्लिनिकच्या काही कर्मचाऱ्यांनी आपल्या गुरुवंदना सोसायटी लकडगंज येथून युगला सोबत नेले आहे. राजू तोटे याने ही माहिती तिला फोनवरून सांगितली होती. युग हा सदर भागात डान्सिंग क्लाससाठी गेला होता. त्यामुळे माझ्या पत्नीने युगला घरी आणण्यासाठी ड्रायव्हर राजू तोटेला पाठविले होते. परंतु त्याने युग हा क्लनिकच्या कर्मचाऱ्यासोबत दुचाकी वाहनाने गेल्याचे आपल्या मालकिणीला सांगितले होते. चांडक आपल्या साक्षीत पुढे म्हणाले , बिल्डिंग वॉचमन अरुण मेश्राम याने आपणास असे सांगितले होते की, ३.४५ ते ४ वाजताच्या दरम्यान २०-२२ वर्षांचा एक तरुण स्कूटीने आल्याचे आणि तो लाल रंगाचा टी शर्ट घातलेला असल्याचे सांगितले होते. त्याने युगची चौकशी केली होती. त्याने तोंडाला रुमाल बांधलेला होता. १०-१५ मिनिटातच युग शाळेच्या गणवेशात (आकाशी रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पँट) परतला होता. युगने स्कूल बॅग वाचमनजवळ दिली होती आणि तो लाल रंगाचा टी शर्ट घातलेल्या तरुणासोबत स्कूटीवर बसून गेला होता. गुरुवंदना बिल्डिंगजवळ जळाऊ लाकडाच्या विक्रीचा धंदा करणाऱ्या राजन तिवारी याने दोन जण एका मुलाला स्कूटीवर बसवून दाना गंजच्या दिशेने घेऊन गेल्याचे सांगितले होते. तिवारीला युगचे छायाचित्र दाखविले असता तो हाच मुलगा असल्याचे त्याने सांगितले होते, असेही चांडक यांनी साक्षीत सांगितले. आपण मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार लकडगंज पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर रात्री ८.१७ आणि ८.४० वाजता आपणास १० कोटी आणि ५ कोटीच्या खंडणीची मागणी करणारे फोन आले होते. (प्रतिनिधी)अन् युगचा मृतदेहच दिसला२ सप्टेंबर रोजी आपण मुलाच्या चौकशीसाठी लकडगंज पोलीस ठाण्यात गेलो होतो. रात्री ९ वाजताच्या सुमारास आपणास पोलीस अधिकाऱ्याने सोबत चलण्यास सांगितले होते. आपले वाहन या अधिकाऱ्याच्या मागे होते. पाटणसावंगीपासून लोणखैरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याजवळ पोलिसांचे वाहन थांबले होते. वाहनातून राजेश उतरला होता. त्याच्या मागे पोलीस होते. त्यांना तो नाल्यात घेऊन गेला होता. अर्ध्या तासाने पोलिसांनी आपणास बोलावून मृतदेह दाखविला. तो आपल्या युगचा होता, असेही त्यांनी साक्षीत सांगितले. राजन तिवारी याचीही साक्ष नोंदवण्यात आली. त्याने न्यायालयात दोन्ही आरोपींना तसेच युगचे छायाचित्रही ओळखले. ओळख परेडच्या वेळी याच आरोपींना ओळखल्याचे त्यांने सांगितले. बचाव पक्षाने या दोघांची उलट तपासणी घेतली. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी आणि सरकार पक्षाला सहाय्य म्हणून फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल हे तपास अधिकारी आहेत.