शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मृत शेतकऱ्यांच्या नावावर उचलले बियाणे

By admin | Updated: March 17, 2017 03:12 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कामठी तालुक्यातील लोणखैरी, नांदा, खापा (पाटण) व चिकना गावातील

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाची कामठी तालुक्यात पोलखोल : जि.प.च्या कृषी समितीत गाजला मुद्दा नागपूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कामठी तालुक्यातील लोणखैरी, नांदा, खापा (पाटण) व चिकना गावातील ५०० शेतकऱ्यांसाठी १४,००० किलो बियाणे आले होते. यातील ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून कृषी अधिकाऱ्यांनी शासनाचे हरभरा बियाणे शेतकऱ्यांना मिळाल्याचे दाखवीत बियाण्यांची परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यात मृत शेतकऱ्यांचादेखील लाभार्थ्यांच्या यादीत समावेश असून, त्यांची सही व बियाणे उचलल्याचे दाखविले आहे. यासंदर्भात जि.प.च्या कृषी समितीत सदस्य नाना कंभाले यांनी हा मुद्दा उचलून धरत, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जि.प.च्या कृषी समितीची सभा सभापती आशा गायकवाड यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. सभेत नाना कंभाले यांनी लाभार्थ्यांच्या यादीसह बियाणे वाटपात झालेला घोळ लक्षात आणून दिला. यासंदर्भात कृषी सभापती आशा गायकवाड यांनी सभेनंतर स्वत: परिसराचा दौरा केला. तसेच कृषी समितीच्या सदस्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर सभेत कुही तालुक्यातील पीक विमा योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या रकमेत तफावत असल्याचे सदस्य उपासराव भुते यांनी निदर्शनास आणून दिले. कुही तालुक्यातील मांढळ, वेलतूर, तितूर या भागात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी ११०० रुपये तर कुही, राजोला व साळवा येथील शेतकऱ्यांना पीक विम्याचे ५,२०० रुपये नुकसान भरपाई मिळाली. एकाच तालुक्यात सारखेच पीक आणि सारखेच नुकसान झाले असताना नुकसान भरपाई मिळण्यात तफावत का? असा सवाल भुते यांनी केला. यासंदर्भात चौकशी करून सर्वांना समान पीक विम्याचे वाटप करण्याची मागणी भुते यांनी केली. त्याचबरोबर कृषी विभागांतर्गत देण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे शेतकऱ्यांकडून त्याची उचल होत नसल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणुन दिले. जे साहित्य कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पुरविले जात आहे ते साहित्य सबसिडीच्या रकमेत बाजारपेठेत उपलब्ध असल्याचे सदस्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भातही चौकशीची मागणी करून, चौकशी होईपर्यंत पुरवठादारांचे बिल थांबविण्याची मागणी सदस्यांनी केली. सभेला सदस्य शिवकुमार यादव, मनोज तितरमारे, विनोद पाटील, कमलाकर मेंघर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)