शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षकांनीच चोरले ७५ लाखांचे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पुण्यातील सिरम बायोटिकचे युनिट असलेल्या मात्र गेल्या १७ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या स्थानिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पुण्यातील सिरम बायोटिकचे युनिट असलेल्या मात्र गेल्या १७ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या स्थानिक फार्मास्युिटकल कंपनीत मोठी चोरी झाली. सुरक्षेची जबाबदारी दिलेल्या कंपनीच्या व्यवस्थापनातील काही जणांनी तसेच सिक्युिरटी गार्डसनी १३ वर्षांत ७५.७४ लाखांचे साहित्य चोरून नेले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसीत महाराष्ट्र ऑन्टिबायोटिक ॲन्ड फार्मास्युिटकल लिमिटेड नावाने कंपनी आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोविशिल्ड लस निर्माण करणाऱ्या पुण्यातील सिरम कंपनीशी संबंधित हे युनिट आहे. २००४ पासून कंपनी बंद अवस्थेत आहे. या कंपनीच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी बॉम्बे सिक्युरिटी सर्व्हिसेसचे सुपर वायझर, एमएपीएल कंपनी तसेच सिक्युरिटी गार्डवर सोपवली. या सर्वांनी संगनमत करून कंपनीत असलेल्या विविध मशिनरीजचे पार्ट, एसी, इलेक्ट्रीक साहित्य, लेबॉरटरी ईक्विपमेंट, कॉम्प्युटर, फर्निचर असे एकूण ७५ लाख, ७४ हजारांचे साहित्य चोरले.

----

संबंधितांचे कानावर हात

२५ ऑगस्ट २००८ ते २० जुलै २०२१ दरम्यान हे साहित्य आरोपींनी लंपास केले. ते लक्षात आल्यानंतर घोष यांनी संबंधितांकडे विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. त्यामुळे कंपनीतर्फे मिता देवतोष घोष (वय ५६, शितलानगर, देहू रोड, पुणे)यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोमवारी चोरीचा गुन्हा दाखल केला. संशयितांची चाैकशी सुरू आहे.

----