शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षक मंडळाचे धनादेश चोरीला

By admin | Updated: October 8, 2015 03:05 IST

नागपूर जिल्हा सुरक्षा मंडळाच्या कार्यालयातून स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश चोरी करण्यात आले.

बँकेत धनादेश वठविण्याचा प्रयत्न : तक्रारीनंतरही सीताबर्डी पोलिसांकडून चौकशी नाहीनागपूर : नागपूर जिल्हा सुरक्षा मंडळाच्या कार्यालयातून स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश चोरी करण्यात आले. संबंधित धनादेशापैकी एका धनादेशावर १७ लाख रुपये लिहून तो वटविण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, देना बँकेतील जागरूक कर्मचाऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस येऊन मंडळाचे लाखो रुपये वाचले. याबाबत मंडळाच्या सचिवांनी सीताबर्डी पोलिसात तक्रार देऊन दोन आठवडे होऊनही सीताबर्डी पोलिसांनी मंडळाच्या कार्यालयात किंवा बँकेत जाऊन साधी चौकशीही केली नाही. या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक रजेवर असल्याचे कारण सीताबर्डी पोलीस समोर करीत आहेत.लाखो रुपयांची अफरातफर करण्याचा प्रयत्न झालेल्या या प्रकरणाच्या चौकशीत सीताबर्डी पोलिसांनी एवढी उदासीन भूमिका का दाखविली याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे. नागपूर जिल्हा सुरक्षा मंडळाच्या कार्यालयातून स्वाक्षरी केलेले काही धनादेश चोरीला गेले. मात्र, मंडळातील कर्मचाऱ्यांना याची माहिती नव्हती. २३ सप्टेंबर २०१५ रोजी देना बँक, खापरखेडा या शाखेचा ११८२१२ या क्रमांकाचा १७ लाख १४ हजार रुपयांचा धनादेश राहुल नत्थुजी बन यांच्या नावाने बँक आॅफ इंडियाच्या वैशाली नगर शाखेत जमा करण्यात आला. संबंधित धनादेश क्लिअरिंंगसाठी देना बँकेच्या इतवारी येथील शाखेत आला. धनादेशावरील रक्कम मोठी असल्यामुळे देना बँकेतील महिला कर्मचाऱ्याने नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयात फोन केला व संबंधित धनादेश वटविण्यासाठी सादर करण्यात आला आहे का, अशी विचारणा केली. यावर मंडळाकडून असा कुठलाही धनादेश कुणालाही देण्यात आला नसल्याचे सांगितले व संबंधित धनादेश वटवू नका, अशा सूचना दिल्या. त्यामुळे बँकेने धनादेश वटविला नाही. बँकेतून आलेल्या फोन नंतर मंडळातील अधिकारी सावध झाले. त्यांनी कार्यालयात उपलब्ध असलेल्या धनादेशांची तपासणी केली असता स्वाक्षरी करून ठेवलेले काही धनादेश गहाळ झाले असल्याचे आढळून आले.राहुल बन यांच्याकडे धनादेश गेला कसा ?मंडळाच्या देना बँकेच्या धनादेशावर १७ लाख १४ हजार रुपये एवढी रक्कम लिहून तो राहुल नत्थुजी बन यांच्या नावाने बँक आॅफ इंडियाच्या वैशालीनगर शाखेत जमा करण्यासाठी सादर करण्यात आला. बन यांचे खाते क्रमांक ८७७६१०११०००१२१४ असे आहे. पोलिसांनी वेळीच दखल घेऊन बँक आॅफ इंडियात चौकशी केली तर बन यांचा पत्ता मिळू शकतो. बन यांची चौकशी केली तर त्यांच्याकडे मंडळाचा धनादेश कुठून आला, त्यांना कुणी दिला व त्यांनी तो वटविण्यासाठी कसा काय सादर केला, या प्रश्नांची उत्तरे मिळून मोठा भंडाफोड होऊ शकतो. मात्र, यासाठी पोलिसांनी तत्परता दाखविणे अपेक्षित आहे. मंडळ करणार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील पोलीस आर्थिक गुन्ह्याच्या तपासाबाबत एवढे उदासीन असतील तर गुन्हेगारांचे मनसुबे आणखी वाढतील. नागपूर जिल्हा सुरक्षा मंडळ हे शासनाचे मंडळ आहे. शासकीय निधीचा अपहार करण्याचा प्रयत्न झालेल्या या प्रकरणात तक्रार देऊनही सीताबर्डी पोलिसांनी चौकशीत दिरंगाई केली. याबाबतची तक्रार मंडळातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार आहे.