शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बसपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

By admin | Updated: September 26, 2014 01:19 IST

बहुजन समाज पक्षाने गुरुवारी विदर्भातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करीत १३ उमेदवारांची घोषणा केली. बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंह आणि डॉ. सुरेश माने

विदर्भातील १३ उमेदवारांची घोषणा : उर्वरित उमेदवारांची घोषणा आजनागपूर : बहुजन समाज पक्षाने गुरुवारी विदर्भातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करीत १३ उमेदवारांची घोषणा केली. बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंह आणि डॉ. सुरेश माने यांनी पत्रपरिषदेत ही यादी जाहीर केली. बसपातर्फे यापूर्वी विदर्भातील १३ उमेदवारांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली. दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा १३ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. दुसऱ्या यादीमध्ये रामटेक विधानसभा क्षेत्रातून भगवान भोंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इतर उमेदवारांमध्ये राहुल अबागड यांना खामगांव (बुलडाणा), जळगाव जळगाव-जमोद(बुलडाणा)मधून त्र्यंबक निकाळजे, आकोट (अकोला)- नंदकिशोर दाबेराव, बाळापूर (अकोला ) -अरुण बगारे, वाशिम- राहुल भगत, कारंजा लाड (वाशिम)- उस्मान गर्वे, अमरावती- मिर्झा बेग, मेळघाट (अमरावती)- किसन जामकर, देवळी (वर्धा)- उमेश म्हैसकर, राजुरा (चंद्रपूर) भारत आत्राम, वरोरा (चंद्रपूर) अ‍ॅड. भूपेंद्र रायपुरे आणि यवतमाळ- मोहम्मद शम्मी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघापैकी २६ उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली आहे. उर्वरित उमेदवारांची नावेसुद्धा निश्चित झाली असून शुक्रवारी त्यांच्या नावांची घोषणा करण्यात येणार असल्याचे डॉ. माने यांनी स्पष्ट केले. तसेच मराठवाड्यातील ४६ पैकी ४० उमेदवारांची घोषणा झाली असून ६ उमेदवारांची घोषणा उद्या करण्यात येईल. तर पश्चिम महाराष्ट्रातील ६० टक्के उमेदवारांची घोषणा झाली असून इतर उमेदवारही लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.