शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जागा वाटपावरून विरोधकांचा पोळा फुटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 20:22 IST

भाजपा मजबूत झाल्यामुळे कमजोर असलेले सर्व विरोधक एकत्र येत आहेत. एकमेकांकडे न पाहणारे आता हातात हात उंचावत आहे. भाजपाने त्यांच्यात प्रेम निर्माण केले आहे. हे पोटनिवडणुकीत एकत्र आले असले तरी मुख्य निवडणुकीत तिकीट वाटपावरून यांचा पोळा फुटेल, असा नेम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर साधला. राजकारणात काहीही घडू शकते. आजचे मित्र उद्या एकमेकांचे शत्रूही होऊ शकतात. मात्र, आम्हाला कुणाची पर्वा नाही. विकासाच्या मुद्यावर आम्ही सर्वांशी ताकदीने लढू, असे आव्हानही त्यांनी दिले.

ठळक मुद्दे नितीन गडकरी : काँग्रेस प्रादेशिक पक्ष झाल्याची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपा मजबूत झाल्यामुळे कमजोर असलेले सर्व विरोधक एकत्र येत आहेत. एकमेकांकडे न पाहणारे आता हातात हात उंचावत आहे. भाजपाने त्यांच्यात प्रेम निर्माण केले आहे. हे पोटनिवडणुकीत एकत्र आले असले तरी मुख्य निवडणुकीत तिकीट वाटपावरून यांचा पोळा फुटेल, असा नेम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर साधला. राजकारणात काहीही घडू शकते. आजचे मित्र उद्या एकमेकांचे शत्रूही होऊ शकतात. मात्र, आम्हाला कुणाची पर्वा नाही. विकासाच्या मुद्यावर आम्ही सर्वांशी ताकदीने लढू, असे आव्हानही त्यांनी दिलेगेल्या चार वर्षात केंद्र सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा गडकरी यांनी शनिवारी प्रसार माध्यमांसमोर सादर केला. या वेळी गडकरी म्हणाले, देशाने नेहरू-गांधी कुटुंबाला ४८ वर्षे राज्य करू दिले. भाजपाला आता ४८ महिने मिळाले आहेत. देशात जातीयवाद व सांप्रदायिकता पसरविण्याचे राजकारण सुरू आहे. आम्ही संविधान बदलत आहोत, अशी भीती दाखवून दलितांना दुरावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुस्लिमांच्या मनात असुरक्षितता पसरविण्याचे काम सुरू आहे. काही घटक जातीत संघर्ष लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, २०१४ पासूनचा क्रम पाहता आता पंजाब वगळता काँग्रेस कुठे आहे. काँग्रेस एक प्रादेशिक पक्ष झाला असल्याची टीका करीत भाजपा देशाच्या उत्तर-पूर्व भागापर्यंत पोहचल्याचे त्यांनी सांगितले. एकट्या आपल्या विभागाने देशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन कोटी रोजगार देण्याचे काम केले आहे. पण विरोधकांचा अपप्रचारावरच भर आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत राहुल गांधी हे जेडीएसही भाजपाची बी टीम असल्याचे सांगत होते. आता त्या बी टीमशी कसे काय सरकार स्थापन करीत आहेत, असा सवाल त्यांनी केला. या वेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.शेतकऱ्यांनी सरकारला सहकार्य करावे देशातील अतिरिक्त उत्पादन व जागतिक अर्थव्यवस्था यामुळे दुधासह कृषी उत्पादनांचे भाव कमी झाले आहेत. साखर, दाळीने गोदामे भरलेली आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने खत, बियाण्याच्या किमती कमी केल्या. कमी दराने कर्ज उपलब्ध करून दिले. सोयाबीनला भाव मिळावा म्हणून आयात शुल्क वाढवून ४५ टक्के केले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार समर्पित आहे. सरकारने अनेक योजना राबविल्या, पण काही समस्या कायम आहेत. शेतकऱ्यांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन गडकरी यांनी संपकरी शेतकऱ्यांना केले.मोदीच पंतप्रधान भाजपाला बहुमतासाठी काही जागा कमी पडल्या तर अशा परिस्थितीत सर्वसंमतीचा उमेदवार म्हणून आपले नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येऊ शकते का, या प्रश्नावर गडकरी म्हणाले, भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल व नरेंद्र मोदी हेच आमचे पंतप्रधान बनतील. साखरेच्या किमतीबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी आपली भेट घेतली. यावेळी पालखी मार्गावरही चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पेट्रोल-डिझेलला इथेनॉल व इलेक्ट्रिकचा पर्याय पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर दिसतात. पण साखर, तेल, कांदे यासारख्या अनेक जीवनावश्यक गोष्टी स्वस्त झाल्या हे दिसत नाही. नुसते राजकारण सुरू आहे. भारतात फक्त ३० टक्के क्रूड आॅईल तयार होते. आठ लाख कोटींची आयात करावी लागते. त्यासाठी भारताने या क्षेत्रात स्वावलंबी होणे आवश्यक आहे. यावर पर्याय म्हणून पुढील काळात इलेक्ट्रिक, इथेनॉल व बायो सीएनजीवरील वाहनांची निर्मिती करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी डिझेल दोन रुपयांनी स्वस्त वर्धा, भंडारा व नागपूर येथे शेतकत्यां ना ट्रॅक्टरसाठी डिझेल दोन रुपयांनी स्वस्तात उपलब्ध करून दिले जाईल. आपल्या साखर कंपन्यांमार्फत ही सोय केली जाईल, अशी घोषणा गडकरी यांनी या वेळी केली.मार्च २०१९ पर्यंत ८० टक्के गंगा निर्मल- गंगा शुद्धीकरणासाठी २१० प्रकल्प राबविण्यात येत आहेत. ७० टक्के गंगा ही १० मोठ्या शहरांमुळे प्रदूषित झाली आहे. या शहरात प्राधान्याने ४७ प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. १०५ चे काम सुरू आहे. मार्च २०१९ पर्यंत ८० टक्के गंगा निर्मल होईल, असा दावा गडकरी यांनी केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMediaमाध्यमे