सीट बेल्टची उपयुक्तता समजूनही दुर्लक्षच : पाच महिन्यात ३४९५ प्रकरणेनागपूर : वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे शहरात जलद आणि सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच सीट बेल्टची उपयुक्तता समजूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील पाच महिन्यात सीट बेल्ट न वापरणार्या ३४९५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. २0१३ मध्ये अशी १४ हजार ४५२ प्रकरणे समोर आल्याची धक्कादायक माहिती आहे. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी प्रवासादरम्यान सीट बेल्ट बांधला असता तर कदाचित ते आज आपल्यात असते, अशी भावना व्यक्त केली जात आहे. या धर्तीवर पुन्हा एकदा ‘सीटबेल्ट’ चर्चेत आले आहे. सीट बेल्ट (सेफ्टी बेल्ट) १२५ केंद्रीय मोटार वाहन कायदा १९९३ ए १ नुसार पुढील आसनाला सीट बेल्ट बसवणे वाहन (छोट्या कार) उत्पादकाला कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे वाहनात समोर बसलेल्या व्यक्तींसाठीच सीट बेल्ट असल्याचे मानले जाते. परंतु समोर बसलेल्या व्यक्तीप्रमाणोच गाडीत मागे बसलेल्या व्यक्तींनीही सीट बेल्ट बांधणो गरजेचे आहे. तज्ज्ञाच्या मते, अपघात झालाच तर सीट बेल्ट वापरणारी व्यक्ती तो न वापरणार्या व्यक्तीच्या तुलनेत वाचण्याची शक्यता ७0 टक्के जास्त असते. दुर्दैवाने या सीट बेल्टचा वापर अनेक जण पोलिसांच्या धास्तीनेच करताना दिसून येतात. विशेषत: ही कारवाई करणारे बहुतांश पोलीसच सीट बेल्ट लावत नसल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलीस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार २0१३ मध्ये १२६५ अपघात झाले आहेत. यात ३१0 जणांचा मृत्यू तर १२६७ जण जखमी झाले आहेत. जानेवारी ते मे २0१४ या पाच महिन्यात ५0३ अपघात झाले असून १११ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४९८ जण जखमी झाले आहेत. अपघाताचा हा आकडा भयावह असला तरी सीट बेल्टचा वापर केल्यास मृत्यूचा आकडा कमी होऊ शकतो असे तज्ज्ञाचे मत आहे. शरीरावर रक्ताचा थेंबही नसला तरी मृत्यूवाहनाला धडक बसल्यानंतर शरीराची गती थांबली तरी शरीरांतर्गत मेंदूत असणार्या मांसपेशी त्याच वेगाने पुढे जात असतात. शरीराची गती अचानक थांबल्याने त्यांची आपापसात जोरात धडक होते. कित्येकदा रक्तवाहिन्या फुटतात व अंतर्गत रक्तस्राव होतो. बाहेर शरीरावर रक्ताचा थेंबही नसतो तरी माणसे मरतात. सीटबेल्ट व्यवस्थित बांधला असेल तर धडक झाल्यानंतर मानवी शरीराला जागेवरच जखडून ठेवलं जातं. त्यामुळे ज्या वेगाने शरीर पुढे जाणार असते त्या वेगाने तीव्रता कमी होते व त्यामुळे डोके किंवा छाती कठीण वस्तूंना धडकत नाहीे.
सीट बेल्ट लावाच!
By admin | Updated: June 6, 2014 01:15 IST