शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

गोंधळात जिचकारांवर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:26 IST

महापालिका सभागृहात प्रामुख्याने सत्ताधारी व विरोधक यांच्यात एखाद्या मुद्यावरून खडाजंगी होते.

ठळक मुद्देनामनिर्देशित सदस्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट : सभागृहात काहींनी जिचकारांच्या विरोधात मत नोंदविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका सभागृहात प्रामुख्याने सत्ताधारी व विरोधक यांच्यात एखाद्या मुद्यावरून खडाजंगी होते. परंतु शुक्रवारी नामनिर्देशित सदस्याच्या नियुक्तीवरून काँग्रेसच्या नगरसेवकांत आपसात खडाजंगी झाली. एका गटाने किशोर जिचकार यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला. परंतु महापौर नंदा जिचकार यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सुचविलेल्या किशोर जिचकार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.वास्तविक प्रश्नोत्तराच्या तासानंतरच नामनिर्देशित सदस्यांचा विषय पुकारला जाणार होता. मात्र सत्तापक्षाने आधी अजेंड्यावरील इतर विषयावर चर्चा केली. कामकाज संपताना हा विषय पुकारण्यात आला. महापौरांनी हा विषय पुकारताच संजय महाकाळकर यांनी जिचकार यांच्या नावाच्या प्रस्तावाला विरोध करीत त्यांच्या प्रस्तावासोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या समर्थनाचे पत्र जोडले आहे का अशी विचारणार केली. असल्यास सभागृहाला माहिती देण्याची सूचना केली. महाकाळकर यांच्या आक्षेपाला विरोध करीत काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांनी जिचकार यांच्या नावाची घोषणा करण्याची मागणी केली. निवडणुकीनंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रूपांतर महापालिका काँग्रेस पार्टीत होते. उच्च न्यायालयानेही विकास ठाकरे यांची याचिका खारिज केली आहे. त्यामुळे जिचकार यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी करीत काँग्रेसमधील अंतर्गत भांडणाला सभागृहात मांडण्याची गरज नसल्याचे गुडधे म्हणाले.जिचकार यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवित संदीप सहारे म्हणाले,तानाजी वनवे यांना काँग्रेसच्या २९ पैकी १६ सदस्यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यांना विरोधीपक्षनेता करण्यात आले. परंतु किशोर जिचकार यांना नामनिर्देशित सदस्य करण्यासंदर्भात नगरसेवकांसोबत चर्चाच केलेली नाही. त्यामुळे माझ्यासह पाच नगरसेवकांनी जिचकार यांच्या नावाला विरोध केला आहे. यासंदर्भात आयुक्तांनाही पत्र दिले आहे. सहारे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत मनोज सांगोळे म्हणाले, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. या न्यायालयाच्या निर्णयापर्यंत हा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात यावा,अशी मागणी त्यांनी केली. तर कमलेश चौधरी यांनी जिचकार यांच्या नावाला समर्थन केले. महापालिका निवडणुकीत काँग्रेसची दुर्दशा झाली. जेमतेम २९ जागा निवडून आल्या. परंतु विरोधीपक्षनेता व नामनिर्देशित सदस्यांवरून पक्षातील अंतर्गत वाद सभागृहात चव्हाट्यावर आला.उच्च न्यायालयात विकास ठाकरे यांची याचिका खारीज करण्यात आली आहे. त्यामुळे वनवे यांनी सुचविलेले किशोर जिचकार यांना नामनिर्देशित सदस्य करण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले तरी न्यायालयाच्या आदेश मानला जाईल, अशी भूमिका सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी मांडली.वनवे यांच्या अडचणी कायमनामनिर्देशित सदस्याच्या मुद्यावरून माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या गटातील नगरसेवकांनी विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्याविरोधात भूमिका घेतली. यावरून वनवे यांच्या अडचणी कायम असल्याचे संकेत मिळाले आहे. वनवे यांची सत्तापक्षासोबत जवळीक वाढल्याचा पक्षातील काही सदस्यांचा आरोप आहे. त्यामुळे भविष्यात संजय महाकाळकर यांच्याप्रमाणे वनवे यांनाही विरोधीपक्षनेते पदावरून हटविण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती काँग्रेसच्या एका नगरसेवकाने दिली. वनवे यांच्या अडचणी कायमनामनिर्देशित सदस्याच्या मुद्यावरून माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या गटातील नगरसेवकांनी विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्याविरोधात भूमिका घेतली. यावरून वनवे यांच्या अडचणी कायम असल्याचे संकेत मिळाले आहे. वनवे यांची सत्तापक्षासोबत जवळीक वाढल्याचा पक्षातील काही सदस्यांचा आरोप आहे. त्यामुळे भविष्यात संजय महाकाळकर यांच्याप्रमाणे वनवे यांनाही विरोधीपक्षनेते पदावरून हटविण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती काँग्रेसच्या एका नगरसेवकाने दिली.