शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

रेशनकार्ड नसलेल्यांचा शोध सुरू, अन्नधान्याच्या किट दिल्या जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:17 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार नागपूर शहर व ग्रामीण भागामध्ये व्यापकस्तरावर सर्वेक्षण करून रेशनकार्ड नसलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. अशा व्यक्तींना २९ मार्चच्या जीआरनुसार अन्नधान्याच्या किट वितरित केल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र : हायकोर्टाच्या निर्देशांची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार नागपूर शहर व ग्रामीण भागामध्ये व्यापकस्तरावर सर्वेक्षण करून रेशनकार्ड नसलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. अशा व्यक्तींना २९ मार्चच्या जीआरनुसार अन्नधान्याच्या किट वितरित केल्या जाणार आहेत.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. यासंदर्भात उच्च न्यायालयात संजय धर्माधिकारी यांची जनहित याचिका प्रलंबित आहे. आतापर्यंत नागपूर शहरातील ३ लाख २५ हजार ७८४ तर, ग्रामीण भागातील १ लाख २ हजार ६०१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात रेशनकार्ड नसलेले शेकडो व्यक्ती आढळून आले असून त्यातील गरजूंना तातडीने १० किलो गहू, १० किलो तांदूळ, १ किलो तूर डाळ, १ किलो चणा डाळ, १ किलो साखर, २५० ग्रॅम चहा पत्ती व १ किलो खाद्य तेल या वस्तूंची किट दिल्या जाणार आहे. यापासून एकही गरजू व्यक्ती वंचित राहू नये याकरिता २९ मार्चच्या जीआरला व्यापक प्रसिद्धी दिली जाणार आहे व किट वितरणाचा दर तीन दिवसानी आढावा घेण्यात येणार आहे. या योजनेचा कुणी गैरउपयोग करू नये याकरिता किट मिळालेल्या व्यक्तींचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. याशिवाय लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेले श्रमिक, विद्यार्थी आदींकरिता ग्रामीण भागात ४०, नागपूर शहरात २६ तर, मेट्रो परिसरात ३६ शेल्टर होम तयार करण्यात आले आहेत. त्यातील हजारो व्यक्तींची आवश्यक काळजी घेतली जात आहे. तसेच, विविध सामाजिक संस्था रोज ९४ हजार गरजू नागरिकांना भोजन वितरित करीत आहेत अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली.याचिकाकर्ता देणार प्रत्युत्तरया प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्रावर प्रत्युत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाला वेळ मागितला. त्यामुळे न्यायालयाने हे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावरील सुनावणी चार आठवडे तहकूब केली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. स्मिता देशपांडे तर, जिल्हाधिकाºयांतर्फे अ‍ॅड. निवेदिता मेहता यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfoodअन्न