शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड तालुक्यातील २० गावे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क मेंढला : नरखेड तालुक्यातील वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्या आदेशान्वये तालुक्यातील २० ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मेंढला : नरखेड तालुक्यातील वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्या आदेशान्वये तालुक्यातील २० गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घाेषित करण्यात आली असून, त्या गावांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. या गावांमधील नागरिकांनी विनाकारण फिरू नये व दुसऱ्या गावात जाऊ नये तसेच बाहेर गावातील व्यक्तीस गावात प्रवेश देऊ नये, असे आवाहन तहसीलदार डी.जी. जाधव यांनी केले आहे.

प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घाेषित करण्यात आलेल्या गावांमध्ये जलालखेडा, राेहणा, थडीपवनी, देवग्राम (थुगावदेव), सिंदी, खैरगाव, दावसा, उमरी (सिंदी), मोहदी (धोत्रा), नारसिंगी‌, कोणी (येणीकाेणी), मेंढला, उमठा, मसोरा, मोहदी (दळवी), खेडी (कर्यात), मालापूर, नांदा (शिंदे), खंडाळा (बु.) व करंजोली या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये काेराेना संक्रमण थाेडे अधिक असल्याने ते कमी करण्यासाठी तसेच येथील संक्रमण इतरत्र पसरू नये यासाठी ३१ मेपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. यात प्रत्येकाने मास्कचा नियमित वापर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य असून, या गावांमधील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक सेवांचा पुरवठा केला जाणार असल्याचेही उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी सांगितले.

दुसरीकडे, या गावात प्रवेश करणारे मुख्य मार्ग सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सील करण्यात आले आहे. त्यामुळे या गावांमधील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर अथवा गावाबाहेर पडू नये. विनाकार फिरणे टाळावे. बाहेरगावांमधील नागरिकांना गावात प्रवेश देणे टाळावे, असे आवाहन तहसीलदार डी.जी. जाधव यांनी केले आहे. या गावांमधील बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. यातील गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची साेय तालुक्याच्या ठिकाणी करण्यात यावी तसेच तिथे बेड, ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर यासह अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी दिलेश ठाकरे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

...

..या बाबींची मुभा

या प्रतिबंधित गावांमधील नागरिकांना वैद्यकीय उपचार, अंत्यसंस्कार, शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच वैद्यकीय सेवेशी निगडित असलेले खासगी डाॅक्टर्स, नर्स, औषधी दुकानदार, पॅथाॅलाॅजिस्ट, रुग्णवाहिका यांच्यासह पाेलीस विभागामार्फत पासधारक जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना मुभा देण्यात आली आहे.